चौदा वर्षांच्या मुलावर वयोवृद्ध जोडप्याकडून लैगिंक अत्याचार
आरोपी वयोवृद्ध जोडप्याविरुद्ध पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 डिसेंबर 2025
मुंबई, – चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर त्याच्याच परिचित एका वयोवृद्ध जोडप्याने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी 73 आणि 70 वर्षांच्या आरोपी वयोवृद्ध जोडप्याविरुद्ध जुहू पोलिसांनी अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार असून या चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
43 वर्षांची तक्रारदार महिला वांद्रे येथे राहत असून पिडीत तिचा चौदा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या मालकीचे विलेपार्ले परिसरात आणखीन एक फ्लॅट आहे. याच ठिकाणी आरोपी वयोवृद्ध जोडपे राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्यातील वादातून त्यांनी या जोडप्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. त्याचा त्यांच्या मनात प्रचंड राग होता.
या तक्रारीवरुन 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2025 या कालावधीत आरोपी जोडप्याने पिडीत मुलाला दमदाटी करुन हाताने बेदम मारहाण केी होती. त्याचे कपडे काढून त्याच्यावर 73 वर्षांच्या वयोवृद्ध अनैसगिंक तर त्याची 70 वर्षांच्या पत्नीने लैगिंक अत्याचार केला होता. त्याने विरोध केल्यानंतर त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली होती.
हा प्रकार गेल्या आठवड्यात त्याने त्याच्या तक्रारदार आईला सांगितला होता. मुलाकडून ही माहिती मिळताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने मुलाला जुहू पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपी वयोवृद्धांविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असून दोन्ही आरोपींची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यांच्यावर अद्याप अटकेची कारवाई झाली नाही, मात्र चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.