हुंड्यासह चारित्र्यावरुन होणार्‍या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

पतीसह एकाच कुटुंबातील पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 डिसेंबर 2025
मुंबई, – हुंड्यासह चारित्र्यावर संशय घेऊन होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणाला शाहिस्ता मोहम्मद अमीन खान या 26 वर्षांच्या महिलेने तिच्या मानखुर्द येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिच्या पतीसह एकाच कुटुंबातील पाचजणांविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी मानसिक व शारीरिक शोषण करुन शाहिस्ताला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पती मोहम्मद अमीन मोहम्मद सईद खान, सासरे मोहम्मद सईद खान, सासू फातिमा खातून मोहम्मद सईद खान, दिर मोहम्मद इरफान मोहम्मद सईद खान नणंद हिना मोहम्मद इरफान खान अशी या पाचजणांची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच सासरे मोहम्मद सईद खान आणि दिर मोहम्मद इरफान खान या दोघांना पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे यांनी दुजोरा दिला.

फिरोज मेहबूब शेख हे पुण्यातील गुलटेकडीचे रहिवाशी असून व्यवसायाने रिक्षाचालक म्हणून काम करतात. त्यांची शाहिस्ता ही मुलगी असून तिचा विवाह डिसेंबर 2019 साली मोहम्मद अमीनशी झाला होता. विवाहानंतर ती तिच्या पतीसोबत गोवंडीतील सासरी राहण्यासाठी आली होती. लग्नानंतर सहा महिने सर्व व्यवस्थित होते, मात्र सहा महिन्यानंतर सासरचे मंडळी तिचा क्षुल्लक कारणावरुन मानसिक शोषण करत होते. जुलै 2021 रोजी तिने एका मुलाला जन्म दिला होता. माहेरी गेलेल्या घरी आणल्यानंतर तिची सासू फातिमा खातून ही तिला पुन्हा कौटुंबिक कारणावरुन त्रास देऊ लागली होती.

ती झोपडपट्टीस राहते, काळी आहे, तिला सोडून अमीनने दुसरे लग्न करावे यासाठी ती तिला सतत टोमणे मारत होती. तिला माहेरच्या लोकांशी बोलू देत नव्हती. तिला उपाशी ठेवले जात होते. घरातील सर्व काम तिला करण्यास सांगून कामावरुन तिचा मानसिक व शारीरिक शोषण केले जात होते. कौटुंबिक वाद घरच्या सांगितला म्हणून तिच्या पतीने तिचयाशी वाद घालून तिला मारहाण केली होती. काही दिवसांनी शेख कुटुंबिय पुण्यातून मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या बहिणीच्या घरी एक मिटींग बोलाविली होती. त्यात त्यांनी शाहिस्ताच्या पतीसह इतर मंडळींशी बोलून मध्यस्थी करुनत्यांचा समजाविण्याचा प्रयत्न केला होता.

या मिटींगनंतर त्यांनी शाहिस्ता आणि अमीनला घरातून बाहेर काढले होते. त्यानंतर ते दोघेही मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड येथे राहण्यासाठी आले होते. मात्र तिथे आल्यानंतर तो शाहिस्ताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिला सतत मारहाण करत होता. कामावर जाताना तो तिच्यासह मुलाला बाहेरुन कडी लावून जात होता. ती मोबाईलवर कोणाशी बोलू नये म्हणून त्याने तिला तिला मोबाईल दिला नाही. घरी टिव्ही आणून देत नव्हता. सतत तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. तिने तिच्या आई-वडिलांकडून पैसे आणावेत म्हणून तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होता. त्याच्या घरातील मंडळी तिच्याविषयी त्याला भडकाविण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे तो तिला आणखीन त्रास देत होता.

याच दरम्यान तिचा दिर इरफानने तिच्याशी जवळीक निर्माण करुन घरात एकटी असताना तिच्या अंगावर हात टाकला होता. या कारणावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. ऑक्टोंबर 2025 रोजी अमीन हा नोकरीसाठी सौदीला गेला होता. शाहिस्तावर नजर ठेवण्यासाठी त्याने सीसीटिव्ही कॅमेरा लावला होता. 5 डिसेंबरला शाहिस्ता ही प्रचंड मानसिक तणावात होती. याबाबत तिच्या पालकांनी तिला विचारले असता तिने पुण्यात आल्यानंतर सांगते असे सांगून फोन कट केला. त्यानंतर तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार शेख कुटुंबियांना समजताच ते मुंबईत आले होते.

याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. याच घटनेनंतर पोलिसांनी फिरोज शेख यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात त्यांनी शाहिस्ताच्या आत्महत्येला तिच्या पतीसह इतर मंडळी जबाबदार असल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पती अमीनसह त्याच्या आई-वडिल, भाऊ आणि वहिणीविरुद्ध पोलिसांनी शाहिस्ताचा मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

याच गुन्ह्यांत नंतर सासरे मोहम्मद सईद आणि दिर मोहम्मद इरफान या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आरोपी पतीसह सासू आणि नणंद या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page