मालाड येथील बोगस कॉल सेंटवरील कारवाईत पाच आरोपींना अटक

प्रतिबंधित औषधांच्या पुरवठ्याच्या आमिषाने अमेरिकन नागरिकांची फसवणुक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 डिसेंबर 2025
मुंबई, – बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून युएस फार्मसी, मेडेक्स एक्सप्रोस या विविध ऑनलाईन औषधी उत्पादने विक्री करणार्‍या कंपनीचे प्रतिनिधी असल्याची बतावणी करुन भारतात प्रतिबंधित असलेल्या वायग्रा आणि सिलासिस या औषधांचा पुरवठा करण्याचा दावा करुन अमेरिकन नागरिकांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा बांगुरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. या कॉल सेंटरमधील कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. मेराज आयुब शेख, फैजान इन्तियाज भलीम, फारुख हुसैन शेख, मोईन इस्तियाक अहमद शेख आणि जिशान नासीर अन्सारी अशी या पाचजणांची नावे आहेत. घटनास्थळाहून पोलिसांनी सात लॅपटॉप, पाच मोबाईल, संगणकाचे सुट्टे भाग, ध्वनी उपकरणे असा 62 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर पाचही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालाड परिसरात एका बोगस कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांची फसवणुक करत असल्याची माहिती बांगुरनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड, पोलीस निरीक्षक अमीत शितोळे, अरविंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सरोळकर, योगेश रंधे, पोलीस उपनिरीक्षक पियुष टारे, मंगेश केंद्रे, शरद वाघमारे, रोहन पाटील, पोलीस हवालदार भूषण भोसले, पावसकर, पोलीस शिपाई गोसावी, पाटील, आवळकर, दळवी, खेडकर आ पथकाने मालाड येथील चिंचोली बंदर, एव्हरशाईन मॉलजवळील देवरुखवाडी आदित्य इंडस्ट्रियल इस्टेटमधील दुसरा मजल्यावरील 49 क्रमांकाच्या कार्यालयात छापा टाकला होता. यावेळी या कॉल सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी ते युएस फार्मसी मेडेक्स एक्सप्रेस या नामांकित कंपनीतून बोलत असल्याचे सांगत होते.

भारतात प्रतिबंधित असलेले या कंपनीचे वायग्रा आणि शिलासिस कंपनीच्या औषधांची वितरण कंपनी असल्याचे सांगून त्यांना ते औषध पाठविण्याचे आमिष दाखवत होते. त्यासाठी त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करत होते. ही रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ते त्यांना कुठलेही औषध न पाठविता त्यांची फसवणुक करत होते. याच गुन्ह्यांत तिथे उपस्थित असलेल्या मेराज शेख, फैजान भलीम, फारुख शेख, मोईन शेख आणि जिशान अन्सारी या पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच गुन्ह्यांत नंतर या पाचजणांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत मेराज हा कंपनीचा मालक तसेच एचआर असून इतर चार आरोपी त्याच्या कंपनीतील कर्मचारी आहेत. जून महिन्यांपासून त्याने ते कॉल सेंटर सुरु होते. गेल्या सहा महिन्यांपासून या कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणुक केली जात होती. ज्या औषधांच्या नावाने विदेशी नागरिकांची फसवणुक केली जात होती, या कंपनीशी त्यांचा काहीही संबंध नव्हता, त्यांचा संबंधित कंपनीशी कोणताही करार नव्हता.

कंपनीतील कर्मचारी झुम वर्क प्लेस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इंटरनेट कॉल करुन अमेरिका तसेच इतर विदेशी नागरिकांची फसवणुक करत होते. त्यांना युएस फार्मसी, मेड एक्सप्रेस कंपनीचे प्रतिनिधी असल्याची बतावणी करुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना संबंधित वायग्रा आणि सिलासिस देण्याचे आमिष दाखवत होते. त्यासाठी त्यांच्याकडून पे पाल या ऑनलाईन पेमेंटद्वारे पेसे घेत होते. अटकेनंतर या सर्वांना गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page