अठरा लाखांच्या अपहारप्रकरणी पतपेढीच्या कर्मचार्‍यासह दोघांना अटक

खातेदारांकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 डिसेंबर 2025
मुंबई, – सुमारे अठरा लाखांचा अपहारप्रकरणी एका खाजगी पतपेढीच्या कर्मचार्‍यासह दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. प्रविण दशरथ चौरसिया आणि प्रशांत गणपत गायकवाड अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. या दोघांनी जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत खातेदारांकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते, अखेर सात महिन्यांनी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.

विजयकुमार कपिलदेव हे 63 वर्षांचे तक्रारदार कांदिवलीतील संत ज्ञानेश्वर नगरात राहतात. याच परिसरातील इराणीवाडीत श्री सिद्धीविनायक सहकारी क्रेडिट सोसायटी नावाची एक पतपेढी असून तिथे ते अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांच्याकडे प्रशांत गायकवाड क्लार्क तर प्रविण चौरसिया हा कलेक्शन एजंट म्हणून कामाला होता. त्यांच्या पतपेढीत अनेक खातेदार असून त्यापैकी काही खातेदारांनी वेगवेगळ्या योजनेतंर्गत कर्ज घेतले होते. त्यासाठी संबंधित खातेदार नियमित पतपेढीत ठराविक रक्कम जमा करत होते. अशा खातेदारांकडून पैसे जमा करुन ती रक्कम पतपेढीत जमा करण्याची तसेच जमा केलेल्या पैशांची नोंद करुन त्यांचे पासबुक खातेदारांना परत देण्याची जबाबदारी प्रविण चौरसिया याच्यावर होती.

1 जानेवारी 2022 ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीत त्याने 110 खातेदारांकडून 18 लाख 71 हजार 577 रुपये घेतले होते. ही रक्कम पतपेढीत जमा न करता त्याने संगणकीय लेझर बुकमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केले होते. याकामी त्याला पतपेढीचा क्लार्क प्रशांत गायकवाड याने मदत केली होती. या दोघांनी संगनमत करुन खातेदारांच्या पैशांचा अपहार करुन ही फसवणुक केली होती. हा प्रकार नंतर विजयकुमार यांच्या निदर्शनास आला होता. या आर्थिक घोटाळ्याची संचालक मंडळांनी गंभीर दखल घेत त्याची चौकशी सुरु केली होती.

चौकशीदरम्यान 110 खातेदारांनी गेल्या दोन वर्षांत प्रशांत चौरसिया आणि प्रशांत गायकवाड 18 लाख 71 हजार 577 रुपये दिले होते. मात्र ही रक्कम त्यांनी पतपेढीत जमा न करता या पैशांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विजयकुमार यांनी पतपेढीच्या वतीने कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रविण चौरसिया आणि प्रशांत गायकवाड याच्याविरुद्ध पोलिसांनी पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

मात्र गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना सोमवारी सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या प्रविण चौरसिया आणि प्रशांत गायकवाड या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी पतपेढीत आर्थिक घोटाळा केल्याची कबुली आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना मंगळवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्यांची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page