पोक्सोच्या गुन्ह्यांत आरोपीला कारावासासह दंडाची शिक्षा
सहा वर्षांत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन आरोपी दोषी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 डिसेंबर 2025
मुंबई, – सहा वर्षांपूर्वी चेंबूर परिसरात झालेल्या एका अल्पवयीन मुलीवरील विनयभंगप्रकरणी आरोपीला विशेष पोक्सो कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. फुलदेव रामप्रित पासवान असे या आरोपीचे नाव असून पाच वर्षांचा सश्रम कारावासासह आठ हजार रुपयांचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन तीन महिने कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे. सहा वर्षांत या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली, यावेळी पोलिसांनी कोर्टात सादर केलेले भक्कम पुरावे आणि साक्षीदारांच्या जबानीवरुन आरोपीला शिक्षा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सहा वर्षांपूर्वी फुलदेव पासवान याच्याविरुद्ध आरसीएफ पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा आरोप होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध विशेष पोक्सो कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी
अलीकडेच पूर्ण झाली होती. पोलिसांनी सादर केलेले भक्कम पुरावे आणि साक्षीदारांच्या जबानीनंतर कोर्टाने आरोपी फुलदेव पासवान याला दोषी ठरविले होते. 24 डिसेंबरला या खटलाचा निकाल देताना कोर्टाने आरोपीला पाच वर्षांचा सश्रम कारावास, आठ हजार रुपयांचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन तीन महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक गजानन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप देसाई, पोलीस उपनिरीक्षक दिपाली पावसे, पोलीस शिपाई मांढरे, महिला शिपाई नायकवडी यांनी ही कारवाई केली होती. सहा वर्षांत खटल्याची सुनावणी होऊन आरोपीला शिक्षा झाल्याने तपास अधिकार्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.