हेव्ही डिपॉझिटच्या अपहारप्रकरणी जिम मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कर्ज असताना फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फसवणुक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 डिसेंबर 2025
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटच्या सुमारे 65 लाखांचा अपहार करुन एका महिलेची फसवणुक झाल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फ्लॅट मालक असलेल्या जिमचा चालक सुलेमान अहमद शेख याच्याविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कर्ज असताना सुलेमानने फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन तक्रारदार महिलेसह तिच्या पतीची फसवणुक केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच सुलेमान पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

झेनाब मोहम्मद कयुम अन्सारी ही 32 वर्षांची महिला तिच्या कुटुंबियांसोबत अंधेरी परिसरात राहते. तिचे पती व्यापारी असून त्यांचा स्वतचा कपड्याचा व्यवसाय आहे. तीन वर्षांपूर्वी तिला राहण्यासाठी घराची गरज होत. त्यामुळे तिच्यासह तिच्या पतीने त्यांच्या परिचित एका ब्रोकर फ्लॅटविषयी माहिती दिली होती. या ब्रोकरने त्यांना अंधेरीतील व्ही. पी रोड, सागरसिटी, पॅसिफिक टॉवर इमारतीमधील बी विंगच्या 204 क्रमांंकाचा एक फ्लॅट दाखविला होता. या फ्लॅटचा मालक सुलेमान शेख असल्याचे सांगून तो एका जिमचा मालक असल्याचे ब्रोकरने सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्या फ्लॅटची पाहणी केली होती.

सुलेमानला फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा होता. फ्लॅट पसंद पडल्याने त्यांनी दोन वर्षांसाठी तीस लाखांचा हेव्ही डिपॉझिट आणि प्रति महिना पाचशे रुपये भाडा देण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे त्यांच्यात दोन वर्षांत करार झाला होता. दोन वर्ष फ्लॅटमध्य राहिल्यानंतर त्यांचा मार्च 2024 रोजी करार संपला ोता. यावेळी त्यांनी सुलेमानला त्यांना आणखीन काही वर्ष राहण्याची इच्छा व्यक्ती केली होती. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा एक वर्षांचा भाडेकरार झाला होता. यावेळी त्यांच्यात 55 लाख रुपये हेव्ही डिपॉझिट आणि पाचशे रुपये भाडा असा करार झाला होता. त्यांनी आधीच त्याला तीस लाख रुपये दिले होते. त्यामुळे त्यांनी आणखीन 25 लाख रुपये दिले होते.

काही महिन्यानंतर सुलेमानने त्यांना हेव्ही डिपॉझिटची रक्कम देणे शक्य नसल्याने त्यांनी तोच फ्लॅट त्याच्याकडून विकत घेण्याचा सल्ला दिला होता. यावेळी त्याने फ्लॅटची किंमत एक कोटी पाच लाख रुपये सांगितले होते. त्याचा प्रपोजल चांगला वाटल्याने त्यांनी त्याचा फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांना या फ्लॅटवर कर्ज असून या कर्जाची सुलेमानने परतफेड केली नव्हती. त्यामुळे फ्लॅटवर कोणत्याही क्षणी बँकेची जप्तीची कारवाई होणार होती.

ही माहिती समजताच त्यांनी सुलेमाकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांच्याकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी दहा लाखांची मागणी केली. त्यामुळे त्यांनी त्याला दहा लाख रुपये दिले होते. अशा प्रकारे तीन वर्षांत त्यांनी सुलेमानला 65 लाख रुपये दिले होते. मात्र ही रक्कम दिल्यानंतर सुलेमान अचानक गायब झाला होता. सप्टेंबर 2024 नंतर त्याचा त्यांना संपर्क साधलानाही. त्याचा परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. 1 मे 2025 रोजी बँकेने फ्लॅटवर जप्तीची कारवाई सुरु केली होती. तशी नोटीस बँकेकडून फ्लॅटवर लावण्यात आली होती.

फ्लॅटवर कर्ज असताना तसेच कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले असतानाही सुलेमानने फ्लॅट खरेदी-विक्रीा व्यवहार पूर्ण न करता हेव्ही डिपॉझिटच्या 65 लाखांचा अपहार करुन झेनाब अन्सारी हिची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर झेनाबने घडलेला प्रकार डी. एन नगर पोलिसांना सांगून सुलेमान शेख याच्याविरुद्घ तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुलेमान हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page