मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 डिसेंबर 2025
मुंबई, – घाटकोपर येथे अमीना इब्राहिम सिद्धीकी या विवाहीत महिलेच्या झालेल्या हत्येचा पर्दाफाश करण्यात पंतनगर पोलिसांना यश आले आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इरफान ऊर्फ चाँद फकरेआलम अन्सारी असे या 42 वर्षांच्या आरोपीचे नाव असून आर्थिक वादातून त्याने अमीनाची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमिना ही तिचा पती इब्राहिम सिद्धीकी आणि चार मुलांसोबत घाटकोपर येथील कामराज नगरात राहत होती. तिचा पती चालक म्हणून काम करतो. जेवण झाल्यानंतर ती तिच्या नणंदसोबत परिसरात फेरफटका मारण्यासाठी जात होती. बुधवारी 24 डिसेंबरला ती नेहमीप्रमाणे तिची नणंदसोबत बाहेर गेली होती. काही वेळानंतर त्या दोघीही त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. मात्र अमीना ही रात्री उशिरापर्यंत घरी आली नव्हती. हा प्रकार तिच्या पतीच्या लक्षात येताच त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्याने पंतनगर पोलिसांना त्याची पत्नी मिसिंग असल्याची तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अमीनाचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गुरुवारी 25 डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजता अमीनाचा मृतदेह कामराजनगरातील एका झुडपात सापडला होता. तिच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. ही माहिती मिळताच पंतनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अमीनाला तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी अमीनाचा पती इब्राहिम सिद्धीकी याच्या तक्रारीवरुन घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
या हत्येच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांचे दहा विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने सर्व शक्यता पडताळून पाहिल्यानंतर या हत्येमागे आर्थिक वाद कारणीभूत असल्याचे उघडकीस आले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी तांत्रिक माहितीसह मानवी कौशल्याचा वापर करुन मोहम्मद इरफान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत अमीना आणि मोहम्मद इरफान हे दोघेही एकमेकांच्या परिचित होते.
अमीनाने त्याच्या पत्नीकडून काही रक्कम उसने घेतले होते, मात्र वारंवार मागणी करुनही अमीनाने तिला पैसे परत केले नव्हते. त्याचा मोहम्मद इरफानला राग होता. याच रागातून त्याने अमीनावर पाळत ठेवून रात्रीच्या वेळेस तिच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन तिची हत्या केली होती. तपासात आलेल्या या माहितीनतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार, पोलीस निरीक्षक अजीत गोंधळी, अस्लम खतीब, राजेश चंदुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडू जाधव, प्रशांत कुंभार, राजेंद्र गायकवाड, प्रकाश बोर्हाडे, कैलास तिरमारे, ज्ञानेश्वर खरमाटे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम ताकमोगे, संतोष जाधव, सागर खोंद्रे, जयवंत पवार, दिपक राजपूत, पंकज पाटील, शरद नाणेकर, अजय गोल्हार, सागर नाळे, दत्तात्रय बनसोडे, विशाल घोरपडे, प्रशांत तायडे, अभिजीत टेकावडे, पोलीस अंमलदार मनोज गायकवाड, सुहास अनुसे, कैलास लांडगे, भाऊपाटील घुगे, रुपेश राठोड, रमेश पवार, नितीन बोराडे, संदीप देवार्डे, सुहास आव्हाड, किरण खरटमल, पोलीस अंमलदार नितीन रोकडे, विनायक आंब्रे, नारायण दळवी, रवि चव्हाण, शैलेश माने, मनोज जाधव, सचिन पाटोळे, आनंद गवळी, महेश राठोड, संदेश गव्हाळे, रविंद्र राजाभोर, मनोज रणखांबे, चेतन भिवसणे, विजय पवार, अनिकेत आटपाडकर, तांत्रिक माहिती रुपाली हाडवळे यांनी केली.