शेअर ट्रेडिंगच्या नावाने २९ लाखांना गंडा घालणार्या दुकलीस अटक
स्टॉक मार्केटच्या आयपीओमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त करुन फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ एप्रिल २०२४
मुंबई, – शेअर ट्रेडिंगच्या नावाने सुमारे २९ लाखांना गंडा घालणार्या एका दुकलीस दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक आंतरराज्य टोळी असून या टोळीने बोगस वेबसाईटच्या माध्यमातून ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
यातील तक्रारदार वसई येथे राहत असून दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बेकर म्हणून कामाला आहेत. १९९२ सालापासून ते शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असून त्यासाठी त्यांनी एक डिमॅट अकाऊंड उघडले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत सोशल मिडीयावर स्क्रोल करताना त्यांना स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगची एक जाहिरात दिसली होती. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन केली होती. त्यानंतर त्यांना एका ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. त्यात शेअर मार्केटसंदर्भात दैनदिन अपडेट दिले जात होते. स्टॉक मार्केटच्या आयपीओमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना २०० ते ३०० टक्के नफा होईल असे सांगून त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सुमारे २९ लाखांची गुंतवणुक केली होती. त्यात त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले. मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. याबाबत विचारणा केल्यानंतर समोरील व्यक्तीने ही रक्कम रिक्वेस रिचेसमध्ये असून त्यासाठी त्यांना काही रक्कम भरावे लागतील असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जानंतर सायबर सेल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह बोगस दस्तावेज बनविणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने तपास सुरु केला होता. आरोपींचा शोध सुरु असताना पोलिसांनी मोमीन आणि मोहम्मदला ताब्यात घेतले होते. तपासात या गुन्ह्यांत या दोघांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यांनी फसवणुकीचे पैसे नऊ विविध खात्यात वळविले होते. मोमीनच्या खात्यात साडेतीन लाख रुपये जमा झाले होते. फसवणुकीची रक्कम त्याने कोणाला दिले होते. बोगस वेबसाईटच्या माध्यमातून ही फसवणुक झाली असून ही वेबसाईट कोणी बनविली होती. या टोळीने एक ग्रुप तयार केला होता. त्यात तक्रारदांना ऍड करण्यात आले होते. या ग्रुपमधील इतर काही लोकांची फसवणुक झाली आहे का याचा सायबर सेल पोलिसांकडून तपास ुसरु आहे. दुसरीकडे या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नावे समोर आली आहे, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.