वाढदिवसाला गेलेल्या मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग
गुन्हा दाखल होताच मैत्रिणीच्या वडिलांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 जानेवारी 2026
मुंबई, – वाढदिवसाला गेलेल्या मुलीच्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिच्या वडिलांनीच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी 46 वर्षांच्या मैत्रिणीच्या वडिलांना भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात पोलीस कोठडी सुनावली आहे.
43 वर्षांची तक्रारदार महिला मुलुंड परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. बळीत ही तिची तेरा वर्षांची आहे. आरोपीची मुलगी आणि तिची मुलगी खास मैत्रिणी आहेत. 12 जानेवारीला तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. त्यामुळे बळीत मुलगी तिच्यासह तिच्या कुटुंबियांसोबत वाढदिवसासाठी नाहूर येथील एका हॉटेलमध्ये गेली होती. रात्री साडेदहा वाजता तिचा तिच्या मैत्रिणीच्या वडिलांनी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयतन केला होता.
घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगताच तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने आरोपीला जाब विचारला होता. यावेळी त्याने तिच्याशी वाद घालून तिला शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर तिने भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मंगळवारी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मैत्रिणीच्या वडिलांनीच अल्पवयीन मुलीचा केलेल्या विनयभंगाच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.