पावणेसात कोटीचे दागिने चोरी करुन दोन नोकरांचे पलायन

चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या नोकरांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 जानेवारी 2026
मुंबई, – सुमारे पावणेसात लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा असा मुद्देमाल चोरी करुन ज्वेलर्स शॉपमधील दोन सेल्समन नोकरांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ज्वेलर्स मालकाच्या तक्रारीवरुन एमएचबी पोलिसांनी दोन्ही नोकराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रभू सिंग आणि नारायण सिंग अशी या दोन सेल्समनची नावे असून ते दोघेही मूळचे राजस्थानचे आहेत. ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून शोध सुरु आहे. चोरीनंतर ते दोघेही त्यांच्या राजस्थान येथील गावी पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी दोन टिम तिथे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा ते बुधवारी दुपारी दिडच्या सुमारास बोरिवलीतील आयसी कॉलनी, होली क्रॉस रोड, रोझमार इमारतीमधील माय गोल्ड पॉईट या ज्वेलर्स शॉपमध्ये घडली. राकेश शांतीलाल पोरवाल हे ज्वेलर्स व्यापारी असून ते बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात राहतात. त्यांखचा सोने, चांदी आणि हिरे खरेदी विक्रीचा व्यवसाय आहेत. त्यांच्या मालकीचे बोरिवली येथे माय गोल्ड पॉईट नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. याच शॉपमध्ये प्रभू सिंग आणि नारायण सिंग हे दोघेही सेल्समन म्हणून काम करत होते. ते दोघेही राजस्थानच्या राजसंबंध, कवारिया गावचे रहिवाशी आहेत. शॉपमध्ये दिवसभरात विक्रीसाठी ठेवलेले विविध सोन्याचे दागिने दुकान बंद करण्यापूर्वी शॉपमधील छोटेखानी रुम असलेल्या दोन लोखंडी तिजोरीत ठेवले जाते. ती जबाबदारी राकेश पोरवाल यांनी प्रभू आणि नारायण यांच्यावर सोपविली होती.

शॉपमध्ये दिवसभर काम केल्यानंतर ते दोघेही बोरिवलीतील सागर लॉजमध्ये जेवण आणून रात्री उशिरा शॉपमध्येच झोपत होते. मंगळवारी रात्री उशिरा एक ग्राहक शॉपमध्ये आल्याने त्यांना दागिने ठेवण्यास उशीर झाला होता. त्यामुळे त्यांनी या दोघांना देऊन दागिने ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर ते त्यांच्या घरी निघून गेले होते. दुसर्‍या दिवशी राकेश पोरवाल हे त्यांच्या डहाणू येथील एका मित्राकडे वैयक्तिक कामासाठी गेले होते. दुपारी त्यांना त्यांच्या ग्राहक महिलेचा फोन आला होता. तिला तिच्या सोन्याच्या दागिन्याचे व्हॅल्यूऐशन करायचे होते. मात्र शॉप बंद असल्याने तिने त्यांना फोनवरुन माहिती दिली. शॉपच्या ग्रीलला बाहेरुन कुलूप लावला होता.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी प्रभू आणि नारायण या दोघांना कॉल केला, मात्र त्यांनी त्यांचे कॉल घेतले नाही. त्यांचा मोबाईल नंतर बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ते डहाणू येथून बोरिवली येथे आले होते. यावेळी त्यांना त्यांचे ज्वेलरी शॉप बंद असल्याचे तसेच बाहेरच असलेल्या लोखंडी गेटमध्ये चावी पडल्याचे दिसून आले. त्यामुळे शॉप उघडून त्यांनी आतमध्ये प्रवेश करुन पाहणी केली होती. यावेळी त्यांना शॉपमध्ये कोणीही नव्हते, तिजोरीचे दरवाजे उघडे दिसले. तिजोरीतील 6 कोटी 79 लाख 85 हजार रुपयांचे विविध सोन्याचे, हिर्‍यांचे आणि चांदीच्या विटा असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.

त्यात सव्वालाखांच्या एक सालिटर डायमंड, 2 लाख 60 हजाराची 800 आणि 1 किलोची प्रत्येकी एक वीट, 80 लाख रुपयांचे ग्राहकांनी गहाण ठेवलेले विविध 650 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 12 लाखांची 24 कॅरेटची प्रत्येकी शंभर ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे बिस्कीट, 43 लाख रुपयांचे 22 कॅरेटचे 350 ग्रॅम वजनाचे 23 मंगळसूत्र, 1 कोटी 17 लाख रुपयांचे 22 कॅरेटचे सोन्याचे 235 हून अधिक कर्णफुले, कानातील झुमके, 1 कोटी 43 लाख रुपयांचे 22 कॅरेटचे 990 ग्रॅम वजनाचे 325 विविध सोन्याचे अंगठी, 43 लाख रुपयांचे 22 कॅरेटचे 350 ग्रॅम वजनाचे 50 ब्रेसलेट, 1 कोटी 18 लाख रुपयांचे 22 कॅरेटचे 880 ग्रॅम वजनाचे 85 सोन्याची चैन, 58 लाख रुपयांचे 22 कॅरेटचे 48 सोन्याच्या बांगड्या, 60 लाख रुपयांचे 22 कॅरेटचे 500 ग्रॅम वजनाचे 25 हजार आदींचा समावेश होता.

हा मुद्देमाल चोरी करुन प्रभू आणि नारायण सिंग हे दोघेही पळून गेले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी एमएचबी पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. राकेश पोरवाल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रभू सिंग आणि नारायण सिंग या दोघांविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. ते दोघेही रात्री उशिरा तिजोरीचे सर्व दागिने चोरी करुन पळून गेले होते. राजस्थानचे रहिवाशी असल्याने ते दोघेही त्यांच्या गावी पळून जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे दोन टिम तिथे रवाना झाले आहेत. बुधवारी उघडकीस आलेल्या चोरीच्या घटनेने स्थानिक ज्वेलर्स व्यापार्‍यामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page