तीस लाखांच्या दागिन्यांसह कॅशसहीत तीन नोकरांचे पलायन
पवई-कांदिवलीतील घटना; दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 जानेवारी 2026
मुंबई, – सुमारे तीस लाखांचे सोन्याचे दागिने आणि कॅश घेऊन तीन नोकरांनी पलायन केल्याची घटना पवई आणि कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पवई आणि समतानगर पोलिसांनी दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या तिन्ही आरोपी नोकरांचा शोध सुरु केला आहे. अरविंद सुबेदार सिंग, मेघा भंडारे आणि अर्चना घाग अशी या दोघींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील अर्चना आणि मेघाने घरकाम करताना एका वयोवृद्धाच्या घरातून 23 लाखांच्या दागिन्यांवर हातसफाई केली तर अरविंदने मालाच्या पेमेंटच्या सात लाखांची कॅश पळविल्याचा आरोप आहे.
पहिली घटना 5 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत पवईतील हिरानंदानी गार्डन, मेन स्ट्रिटच्या बर्चवुड अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या बी/1202 मध्ये सविता थावरदास भाटिया ही 88 वर्षांची वयोवृद्ध महिला तिच्या वयोवृद्ध पती थावरदास भाटिया यांच्यासोबत राहतो. तिचा मुलगा किरण हा आबूधाबी येथे नोकरी करत असून त्याच्या कुटुंबियांसोबत तिथे राहतो. त्यांच्या घरी गेल्या दोन महिन्यांपासून अर्चना घाग आणि मेघा डांगरे नावाच्या दोन महिला घरकाम करतात. या दोघींना एका खाजगी प्लेसमेंट कंपनीने त्यांच्या घरी कामासाठी पाठविले होते. त्यापैकी मेघा ही जेवण बनविण्याचे तर अर्चना हाऊसकिपिंगचे काम करते. तिच्या पतीने गेल्या तीस वर्षांत दुबई, आबूधाबी, बहरीन, मस्कत आदी शहरामध्ये काम केले होते.
या कामादरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांवर गुंतवणुक केली होती. ते सर्व दागिने तिने तिच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. 5 जानेवारीला तिला बाहेर जायचे होते. त्यामुळे तिने कपाटातील सोन्याचे बांगड्या काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे तिला बांगड्या दिसून आल्या नाही. तिने कपाटात सर्वत्र शोध घेतला, मात्र तिला कुठेच बांगड्या सापडल्या नाही. 8 जानेवारीला तिने कपाटातून सोन्याचा हार काढण्याचा प्रयत्न केला, यावेळी तिला पुन्हा सोन्याचा हार दिसला नाही.
त्यामुळे तिने सर्व दागिन्यांची पाहणी केली होती. त्यात तिला 23 लाख रुपयांचा 230 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे बांगड्या, हार, अंगठी आणि किचन आदी दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने मेघा आणि अर्चनाकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी उडवाडवीचे उत्तरे देऊन तिला टाळण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच तिने पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांच्या घरातील दोन्ही मोलकरणीवर चोरीचा संशय व्यक्त करुन तक्रार केली होती.
दुसरी घटना कांदिवली येथे घडली. साहिल युनूस मुजावर हा 24 वर्षांचा तरुण कांदिवलीतील हनुमाननगर परिसरात राहतो. त्याचा स्वतचा एक ट्रक असून या ट्रकमधून गहू, तांदूळ आणि कडधान्याचे ट्रान्सपोर्ट करतो. त्याच्याकडे अरविंद सिंग हा चालक म्हणून कामाला असून तो मालाड येथे राहतो. 10 जानेवारीला त्याला ब्रिजेश गुप्ता आणि दिलीप गुप्ता यांनी वाशी मार्केट येथून कडधान्य आणण्यासाठी सात लाख रुपये दिले होते. ती रक्कम त्याला रौनक टक्कर यांना द्यायची होती. त्यामुळे तो अरविंदसोबत वाशी मार्केटला गेला होता.
यावेळी घाईघाईत माल भरल्यानंतर त्याने रौनकला पैसे देण्यास विसरला होता. कांदिवली येथे आल्यानंतर त्याने लोखंडवाला, साई गार्डनसमोर ट्रक पार्क केला. यावेळी तो ट्रकमधील डिक्कीतून पैसे न काढता घरी निघून गेला होता. दुसर्या दिवशी तो ट्रकजवळ आला होता. यावेळी त्याला डिक्कीत सात लाख रुपयांची कॅश सापडली नाही. त्यामुळे त्याने अरविंदला कॉल केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. तो सात लाखांची कॅश घेऊन पळून गेल्याची खात्री होताच त्याने त्याच्याविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती.
या दोन्ही तक्रारीनंतर पवई आणि समतानगर पोलिसांनी अरविंद सिंग, मेघा भंडारे आणि अर्चना घाग या तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सागितले.