एग डोनर्ससह सरोगेट माता पुरविणार्या टोळीचा पर्दाफाश
तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल तर दोघींची चौकशी सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 जानेवारी 2026
मुंबई, – भारतात प्रतिबंधित असलेल्या व्यावसायिक सरोगती करण्याचे व्यवस्थापन करुन बोगस कागदपत्रे बनवून अविवाहीत तरुणींना एग डोनर्ससह सरोगेट माता पुरविण्यास प्रवृत्त करणार्या एका टोळीचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी बँकाँकहून आलेल्या दोन महिलांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करुन त्यांना पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी सुनोती, विंझारत आणि संगीता नावाच्या तीन महिलाविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत सुनोती आणि विंझारत या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. यातील संगीता आणि सुनोती या आयव्हीएफ क्षेत्रात एजंट म्हणून काम करत असून त्यांनी विंझारतच्या मदतीने देश-विदेशतात एग डोनर्स केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.
वैभव नामदेव भोसले हे अॅण्टॉप हिल येथे राहत असून सध्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय गुप्तचर विभागात कामाला आहेत. शुक्रवारी ते आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून कार्यरत होते. दुपारी दोन वाजता तिथे सुनोती नावाची एक महिला आली होती. तिच्याकडील भारतीय पासपोर्ट, बोर्डिंग पाससह इतर कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ती बँकाँक येथून आल्याचे उघडकीस आले. तिला बँकॉकला जाण्यामागील कारण विचारले असता तिने उत्तर दिले नाही. त्यामुळे तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. याच दरम्यान विंझारत नावाच्या एका महिलेस या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तीदेखील बँकॉकहून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. यावेळी या दोघींची स्वतंत्रपणे चौकशी करणयात आली होती.
त्यात सुनोतीने ती 2024 पासून आयव्हीएफ क्षेत्रात एजंट म्हणून काम करत असून तिने संगीता नावाच्या एका महिलेसोबत ठाण्यात ईलाईट केअर नावाची एक एजन्सी स्थापन ेली होती. या एजन्सीद्वारे त्या दोघीही भारतासह विदेशात विविध प्रजनन केंद्रांना एग डोनर्स आणि सरोगेट माता पुरविण्याचे काम करत होते. त्यातून त्यांना मोठा आर्थिक फायदा होत असल्याची कबुली दिली. तिने काही आयव्हीएफ केंद्राना अविवाहीत महिला डोनर्स म्हणून पुरविल्या असून त्यांचे बोगस कागदपत्रे तयार केली होती. सरगसी कायद्यांतर्गत भारतात अंडीदान करण्याासाठी महिला विवाहीत असणे आणि तिला किमान स्वतचे एक अपत्य असणे अनिवार्य आहे. मात्र या नियमांचे तिने सर्रासपणे उल्लघंन केले होते. तिच्यासोबत बँकाँकहून आलेल्या विंझारतला तिने मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखवून बँकाँकला नेले होते.
तपासात आलेल्या या माहितीनंतर या अधिकार्यांनी विंझारतची चौकशी केली. या चौकशीत तिने ती 2022 साली संगीताच्या संपर्कात आली होती. तिच्या मदतीने तिने 2023 साली अंधेरीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये स्वतच्या गर्भातील अंडी-जनुक विक्री केली होती. 2024 साली ती सुनोती आणि संगीताच्या सांगण्यावरुन केनिया, कझाकिस्तान, थायलंड येथे गेली होती, मात्र वैद्यकीय कारणामुळे तिला तिचे जनुक विक्री करता आले नव्हते. काही दिवसांपूर्वी सुनोती ही विंझारतला बँकॉकला एग डोनेशन टेस्टसाठी घेऊन गेली होती. यापूर्वीही त्या दोघीही अनेकदा बँकाँकला गेले होते. तिथे विंझारतने बोगस कागदपत्रांच्या आधारे ती विवाहीत असल्याचे दाखवून एग डोनेशन केल्याची कबुली दिली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या दोन्ही महिलांना पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. आतापर्यंतच्या चौकशीत संगीता आणि सुनोतीने विंझारतकडून व्यावसायिक सरोगशी करुन घेतल्याचे तसेच तिचा संपूर्ण वैद्यकीय खर्च, विमा आणि तिला आर्थिक मोबदला देऊन स्वत फायदा करुन घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या दोघींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत या तिघींना इतर कोणी मदत केली का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.