दिल्ली बॉम्बस्फोटासह मनी लॉडिंग गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून गंडा

सदानंद दाते यांच्या नावाचा वापर करणार्‍या अज्ञात ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स
२२ जानेवारी २०२६
मुंबई, – दिल्लीतील बॉम्बस्फोटासह मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचा आरोप करुन राष्ट्रीय तपास यंत्रणेचे माजी प्रमुख सदानंद दाते यांच्या नावाने एका वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने सुमारे साडेसोळा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पश्‍चिम प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. हा संपूर्ण प्रकार ११ डिसेंबर २०२५ ते ६ जानेवारी २०२६ या कालावधीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

रावजीभाई विश्रामभाई डाभी हे ७५ वर्षांचे वयोवृद्ध अंधेरी परिसरात राहत असून ते महागनरपालिकेतून मुकादम म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मोठा मुलगेा रमेशभाई हा सध्या महानगरपालिकेत कामाला आहे. ११ डिसेंबर २०२५ रोजी घरी असताना त्यांना त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो दिल्लीतील दशहतवाद विरोधी पथकातून पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. दिल्लीत अलीकडेच झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होणार आहे.

देशाचा सुरक्षेचा प्रश्‍न असल्याने त्यांनी चौकशीबाबत कोणाशी चर्चा करु नये. ही चौकशी पूर्णपणे गोपनीय राहणार आहे. त्यानंतर त्यांनी त्यांना ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मोबाईलवरुन सिग्नल नावाचे ऍप डाऊनलोड केले होते. त्यात त्यांना ऍपवर एटीडी या आयडीवरुन व्हिडीओ कॉल आला होता. या व्यक्तीने तो राष्ट्रीय तपास यंत्रणेतून बोलत असल्याचे सांगून त्याचे नाव सदानंद दाते असल्याचे सांगितले. त्याने त्यांना त्यांचा दिल्लीतील बॉम्बस्फोटासह मनी लॉड्रिंगचय गुन्ह्यांत सहभाग असल्याचे काही पुरावे असल्याचे सांगितले. त्यांच्या मोबाईलला लिंक असलेल्या बॅक खात्यात सात कोटी रुपये जमा झाले आहे.

ही रक्कम मनी लाड्रिंगची असल्याने त्यांची चौकशी होणार असून याच चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याची धमकी दिली होती. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने त्यांना ऍपवरुन त्यांचे अटक वॉरंट पाठविले होते. याबाबत कोणाशी चर्चा करु नका, घरीही कोणालाही याबाबत माहिती देऊ नका. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची माहिती दशहतवादी संघटनेकडे असून त्यांच्य जिवाला धोका आहे असे सांगून ही चौकशी गोपनीय असल्याचे सांगितले.

काही वेळानंतर त्याने त्यांना त्यांच्या बँक खात्याची आरबीआय बँकेद्वारे शहानिशा केली जाणार आहे. त्यासाठी बँकेतील सर्व रक्कम त्यांनी त्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. दिल्ली बॉम्बस्फोटासह मनी लॉड्रिंग तसेच त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना दशहतवादी संघटनेकडून धोका असल्याने भीतीपोटी त्यांनी त्यांच्या बँक खात्यातील साडेसोळा लाखांची रक्कम संबंधित बॅक खात्यात जमा केली होती.

ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांची चौकशी कधीपर्यंत पूर्ण होईल, त्यांची रक्कम त्यांना परत कधी मिळेल याबाबत चौकशी केली होती, मात्र त्याने त्यांना काहीच प्रतिसाद न देता ऍपवर त्यांना ब्लॉक केले होते. त्यामुळे त्यांचा त्याच्याशी संपर्क पूर्णपणे बंद झाला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात त्याने पश्‍चिम प्रादेशिक सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन खंडणी, फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे. त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page