मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई, – सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळ फायरिंग करणार्या दोन्ही शूटरच्या पोलीस कोठडीत आणखीन चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर राऊत पाल अशी या दोघांची नावे असून पोलीस कोठडीत मुदत संपत असल्याने या दोघांनाही गुरुवारी दुपारी कडकोट पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांच्या पोलीस कोठडीत सोमवार २९ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. गोळीबारात दोन्ही शूटरने वांद्रे, वाकोला आणि सुरतला पळून जाताना तीन वेळा कपडे बदलून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला गेला आहे. या दोघांनाही सलमानच्या घराच्या दिशेने ४० हून अधिक गोळा फायर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. मात्र ते दोघेही पाच गोळ्या फायर करुन पळून गेले होते. या गुन्ह्यांतील दोन्ही पिस्तूल, चार मॅगझीन आणि सतरा जिवंत काडतुसे जप्त केल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.
सलमान खान याच्या गोळीबार केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत या कटातील दोन्ही शूटरला गुजरातच्या भूज शहरातून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. पोलीस तपासात विकीकुमार आणि सागरकुमार यांनीच सलमानच्या घराजवळ फायरिंग केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक करुन कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना गुरुवारी दुपारी त्यांना पोलीस बंदोबस्तात पुन्हा किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी त्यांच्या चौकशीसाठी आणखीन पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र मागणी मान्य करुन न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत २९ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. यावेळी पोलिसांनी आतापर्यंतच्या झालेल्या तपासाची माहिती न्यायालयात सांगितली. गोळीबारानंतर ते दोघेही वांद्रे येथून सांताक्रुज आणि नंतर सुरतला पळून गेले होते. या प्रवासादरम्यान त्यांनी तीन वेळा कपडे बदलून करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.
या गुन्ह्यांत आतापर्यंत नऊजणांची जबानी नोंदविण्यात आली असून त्यांना साक्षीदार बनविण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची साक्ष न्यायाधिशांसमोर घेण्यात आली होती. गोळीबारापूर्वी आणि गोळीबारानंतर त्यांच्याकडे तीन मोबाईल होते, त्यापैकी एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून उर्वरित दोन्ही मोबाईल त्यांनी तोडफोड करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ते दोघेही इंटरनेटच्या माध्यमातून एका व्यक्तीशी संपर्कात होते. संभाषणानंतर ते दोघेही वायफाय बंद करत होते. त्यानंतर पुन्हा इंटरनेट सुरु करत होते. तो व्यक्ती कोण, त्याने त्याला काय आदेश दिले होते याचा तपास बाकी असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडून उर्वरित दोन मोबाईलची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. सलमान खानसोबत त्यांची कुठलीही दुश्मनी नव्हती, त्यामुळे त्यांनी सलमानच्या घराजवळ गोळीबार करण्यामागे नक्की काय उद्देश होता. ते मार्च महिन्यांपासून मुंबईसह पनवेल शहरात वास्तव्यास होते. यावेळी त्यांनी त्यांनी सलमानच्या घरासह पनवेलच्या फार्महाऊसची रेकी होती.
या गुन्ह्यांत त्यांचे इतर किती सहकारी आहेत याचा तपास सुरु आहे. ते दोघेही बिहार, राजस्थान आणि हरियाणा राज्यातील काही लोकांच्या संपर्कात होते. त्यांच्याकडून त्यांना आर्थिक मदत तसेच शस्त्र पुरवठा झला होता. ते कोण आहेत याचाही तपास बाकी असल्याचे पोलिसांनी सागितले. पोलीस कोठडीत वाढ मिळताच या दोघांनाही पुन्हा न्यायालयात पोलीस बंदोबस्तात गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. आता या दोघांना सोमवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.