तमन्ना भाटिया हाजिर हो

राज्य सायबर सेलकडून चौकशीसाठी समन्स

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई, – सिनेअभिनेत्री तमन्ना भाटिया हिला राज्य सायबर सेलने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले आहे. तिला २९ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहून पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. फेअर प्ले बेटींग ऍपप्रकरणी ही चौकशी होणार असून या गुन्ह्यांत तिची साक्षीदार म्हणून जबानी नोंदविण्यात येणार आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी रॅपर बादशाह याची सायबर सेल पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. या प्रकरणात इतर काही बॉलीवूड कलाकरांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांची चौकशी होणार असल्याचे बोलले जाते.

वायकॉम १८ ही मनोरंजन क्षेत्रातील एका नामांकित कंपनी असून या कंपनीला आयपीएलच्या क्रिकेट सामन्याचे प्रसारणाचे हक्क देण्यात आले होते. तरीही फेअर प्ले बेटींग ऍपने अनधिकृतपणे आयपीएल सामन्याचे प्रक्षेषण दाखवून स्वामीत्व हक्कांचे उल्लघंन केले होते. या प्रक्षेपणामुळे वायकॉम १८ या कंपनीला सुमारे शंभर कोटीचे नुकसान सोसावे लागले होते. त्यामुळे कंपनीच्या वतीने गेल्या वर्षी राज्य सायबर सेल विभागात रितसर तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर फेअर प्ले बेटींग ऍपच्या मालकासह संचालक आणि इतर आरोपींविरुद्ध स्वामीत्व हक्कांचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या कंपनीसाठी तमन्ना भाटियाख संजय दत्त, रॅपर बादशाह, सुनिल शेट्टीसह इतर बॉलीवूड कलाकरांनी प्रमोशन केले होते. त्यामुळे तमन्ना भाटिया हिला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स राज्य सायबर सेलकडून देण्यात आले आहे. तिला सोमवारी २९ एप्रिलला चौकशी राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तिला जाहिरातीसाठी कोणी संपर्क साधला होता. त्यासाठी तिला रुपयांचे मानधन मिळाले याबाबत तिची चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे तमन्नाला साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तमन्नानंतर इतर बॉलीवूड कलाकारांना चौकशी बोलावून त्यांची जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page