मुंबई-चेन्नई इंडिगो विमानात धमकीच्या चिठ्ठीने तणावाचे वातावरण
मुंबईत येऊ नका, आलात तर सगळे मरतील अशी चिठ्ठीद्वारे धमकी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – मुंबईत येऊ नका, आलात तर सगळेच मरतील असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी मुंबई-चेन्नई प्रवासादरम्यान इंडिगो विमानात सापडल्याने प्रवाशांसह विमानातील कर्मचार्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. या धमकीनंतर संपूर्ण विमानासह प्रवाशांच्या सामानाची झडती घेण्यात आली. मात्र कुठेही काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे ती अफवा असल्याचे उघडकीस आले. दरम्यान या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत विमानतळ पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चिठ्ठीद्वारे धमकी देऊन तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहे.
मंगळवारी सकाळी चेन्नईहून मुंबईला इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानाने उड्डान केले होते. काही वेळानंतर ते विमान मुंबईत विमानतळावर लॅण्ड करणार होते. याच दरम्यान इंडिगोच्या एका कर्मचार्याला शौचालयात टिश्यू पेपरवर लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. त्यात मुंबईत आलात तर सगळे मरतील असा मजकूर देण्यात आला होता. या धमकीनंतर त्याने ती माहिती त्याचे वरिष्ठ कॅप्टनला दिली. ही माहिती कॅप्टनकडून केब्रीन क्रुने ट्रॉफिक कंट्रोलला देण्यात आली होती. इंडिगोचे विमान मुंबई विमानतळावर लॅण्ड होताच सर्व प्रवाशांना खाली उतरवून संपूर्ण विमानासह प्रवाशांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली होती. मात्र तिथे काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. कोणीतरी खोडसाळपणा करुन धमकीची चिठ्ठी ठेवून तणावाचे वातावरण निर्माण केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे संबंधित कर्मचार्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. लवकरच धमकीची चिठ्ठी ठेवणार्या या व्यक्तीला अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान या धमकीमुळे विमानातील कर्मचार्यासह प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.