मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ मे २०२४
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्यासह मोबाईल तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने विमानतळावरील एका खाजगी कंपनीच्या कर्मचार्यासह भारतीय प्रवाशांना अटक केली. गेल्या चार दिवसांत या अधिकार्यांनी वीसहून अधिक गुन्ह्यांत विदेशात चोरट्या मार्गाने आणलेल्या ८ कोटी ३७ लाख रुपयांचे सोने आणि महागड्या मोबाईलचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित प्रवाशांवर कारवाई केल्यानंतर लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विदेशात मोठ्या प्रमाणात होणार्या सोने, ड्रग्ज, विदेशी चलन, मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या तस्करीनंतर सीमा शुल्क विभाग सतर्क झाले होते. त्यामुळे विदेशातून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची या अधिकार्यांनी तपासणी सुरु केली. त्यासाठी या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेतंतर्गत २९ एप्रिल ते २ मे २०२४ या कालावधीत या अधिकार्यांनी विदेशात आलेल्या काही भारतीय नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीसह सामानाची झडती घेतल्यानंतर या अधिकार्यांना कोट्यवधी रुपयांचे सोने, आयफोनसह इलेक्ट्रॉनिक वस्तूचा साठा सापडला. यातील दहा प्रवाशी दुबईतून, दोन प्रवाशी मस्कत तर प्रत्येक एक प्रवाशी आबूधाबी, बेहरीन जेद्दाह येथून आले होते. या प्रवाशांनी मेणातील सोन्याची धूळ, सोन्याचे थर असलेले कापड, क्रुड ज्वेलरी आणि पट्ट्या विविध प्रकारात सोन्याच्या आतमध्ये बाटलीमध्ये आणि पॅक्सच्या शरीरातून लपवून आणले होते. यातील एका घटनेत सीआयएसएफच्या अधिकार्यांनी विमानतळावरील कर्मचार्याकडून सुमारे अडीच कोटीचे सोने जप्त केले आहे. हा कर्मचारी विमानतळावरील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याने बाटलीतून सोने तस्करीचा प्रयत्न केला होता. इतर चार प्रवाशांनी अर्ंतवस्त्रांतून सोने आणल्याचे उघडकीस आले. एका भारतीय प्रवाशाने हँडबँगमध्ये एक विशिष्ठ कप्पा करुन त्यातून मोठ्या प्रमाणात महागडे आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणले होते. या सर्वांना नंतर ताब्यात घेण्यात आले होते.