मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याच्या कटातील मुख्य आरोपी पवन पांडुरंग पाटणकर (२५) याला विशेष पोक्सो कोर्टाने २० वर्षांच्या कारावासासह दहा हजार रुपयांचा दंड, आणि दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन एक महिन्याचा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सबळ पुराव्यासह साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे तीन वर्षांत या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन आरोपीला कठोर शिक्षा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
१२ वर्षांचा पिडीत मुलगा हा त्याच्या पालकांसोबत लोअर परेल परिसरात राहतो. याच परिसरात पवन हादेखील राहत होता. तीन वर्षांपूर्वी त्याने त्याला लाकडे गोळा करण्यासाठी नेले आणि अपोलो मिल कंपाऊंडजवळ त्याच्यावर अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार नंतर मुलाकडून त्याच्या पालकांना समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. पवनने अशाच प्रकारे यापूर्वीही त्याच्यासोबत लैगिंक अत्याचार केला होता. त्यामुळे मुलाच्या पालकांनी ना. म जोशी मार्ग पोलिसांत पवनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पवनविरुद्ध पोलिसांनी ३७७ भादवी सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दोषी आरोपीविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपायुक्त परमजीतदहिया, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबवाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे यांच्यासह त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन काही तासांत पवन पाटणकर याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध पोक्सो कोर्टात सबळ पुरावे गोळा करुन आरोपपत्र सादर करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून या खटल्याच नियमित सुनावणी सुरु होती. ही सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली. यावेळी पोक्सो कोर्टाच्या न्या. जाधव यांनी या गुन्ह्यांत पवनला दोषी ठरविले होते. याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी न्या. जाधव यांनी वीस वर्षांच्या कारावास, दहा हजार रुपयांचा दंड आणि दंडाची रक्कम भरली नाहीतर आणखीन एक महिना कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात सरकारी वकिल म्हणून रुपाली मिटकेवार यांनी काम पाहिले तर ना. म जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे, पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांनी मौलाचे मार्गदर्शन केले. कोर्ट पैरवी कामकाज म्हणून हवालदार दिपक कचवाई, देवरुखकर यांनी महत्त्वाची कामगिरी बजाविली होती. तीन वर्षांत आरोपीला कठोर शिक्षा झाल्याने संबंधित पोलीस अधिकार्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात येत आहे.