मोबाईलची लाच मागणे महागात पडले

महिला उपनिरीक्षकाला डमी मोबाईल घेताना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – गुन्ह्यांत मदत करण्याचे आश्‍वासन देताना मोबाईलची लाच मागणे एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. याच गुन्ह्यांत राजश्री प्रकाश शिंत्रे या महिला उपनिरीक्षकाला बुधवारी सायंकाळी आंबोली पोलीस ठाण्यात डमी मोबाईल घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पोलीस ठाण्यात एसीबीच्या झालेल्या या कारवाईमुळे तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

राजश्री शिंत्रे या आंबोली पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे एका गुन्ह्यांचा तपास होता. याच गुन्ह्यांत नेटवर्किंग इंटरनेटचा व्यवसाय असलेला तक्रारदार आरोपी असून त्यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. अटकेनंतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टाने जामिनावर सोडून दिले होते. याच गुन्ह्यांत तपासकामी जात असताना त्यांना उपनिरीक्षक जयश्री शिंत्रे यांनी मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामोबदल्यात तिने त्यांच्याकडे एका सॅमसंग कंपनीच्या मोबाईलची लाच म्हणून मागणी केली होती. ही लाच देण्याची दर्शवून त्यांनी ३ मेला राजश्री शिंत्रे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याची मंगळवारी ७ मे रोजी शहानिशा करण्यात आली होती, त्यात राजश्री शिंदे हिने लाच म्हणून मोबाईल घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या पथकाने बुधवारी ८ मेला आंबोली पोलीस ठाण्यात सापळा लावला होता. ठरल्याप्रमाणे तक्रारदार पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी राजश्री शिंत्रे यांची भेट घेऊन त्यांना सॅमसंग कंपनीचा एक डमी मोबाईल दिला होता. ही देवाणघेवाण सुरु असतानाच तिथे आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजश्री शिंत्रे यांना मोबाईल म्हणून लाच घेताना रंगेहाथ पकडले. तिच्याविरुद्ध ७ भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियिम कायदा कलमातर्ंगत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर तिला या अधिकार्‍यांनी अटक केली. या कारवाईने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page