मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – मानसिक तणावातून एका ३२ वर्षांच्या लोडरने आत्महत्या केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. आशुतोष राजाश्रय दुबे असे कर्मचार्याचे नाव असून त्याने कंपनीच्या स्टोअर रुममध्ये गळफास घेऊन जीवन संपविले. त्याच्याकडे एक सुसायट नोट सापडली असून त्यात त्याने सोनी मॅडम बेकसुर है. बेकसुर मरनेवाला झूठ नही बोलता असे लिहिले आहे. त्यामुळे ती सोनी मॅडम कोण, त्याच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण होते याचा एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान या आत्महत्येची माहिती दुबे कुटुंबियांना देण्यात आली असून शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.
ही घटना रविवारी १२ मेला दुपारी एक ते दोनच्या सुमारास अंधेरीतील पेपर बॉक्स, पीएम कोना कंपनीच्या स्टोअर रुममध्ये घडली. आशुतोष दुबे हा अंधेरीतील पंपहाऊस, जिजामाता रोड, रामजी गब्बर चाळीत राहत होता. गेल्या दहा वर्षांपासून तो पीएम कोना कंपनीत लोडर म्हणून कामाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावात होता. सकाळी नऊ वाजता कामावर हजर झाल्यानंतर तो त्याचा सहकारी गणेश निंबाळकर याच्यासोबत काम करत होता. दुपारी लंच टाईम झाल्यानंतर तो आला नाही म्हणून गणेश त्याला बोलाविण्यासाठी स्टोअर रुममध्ये गेला, मात्र स्टोअर रुमचा दरवाजा आतून बंद होता. त्याने त्याला आवाज दिला, मात्र आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच गणेशने दरवाज्यावरील जाळीतून आत पाहिले. यावेळी त्याला आशुतोषने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या प्रकाराने तो प्रचंड घाबरला आणि त्याने कंपनीच्या अधिकार्यासह एमआयडीसी पोलिसांनपा ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आशुतोषला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे पोलिसांना एक सुसायट नोट सापडली असून त्यात त्याने सोनी मॅडम बेकसुर है. बेकसुर मरनेवाला झूठ नही बोलता असे लिहिले होते. ही नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. त्याने सोनी मॅडमचा उल्लेख होता, तिचे आणि त्याच्या आत्महत्येमागे काय गुपित आहे याचा पोलीस तपास करत आहे. लवकरच कंपनीच्या अधिकार्यासह कर्मचार्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. या गुन्ह्यांचा तपास किरण पर्वत हे करत असल्याचे पोलिसांनी संागितले.