खाऊसाठी पैसे देऊन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
मालाड येथील घटना; ४३ वर्षांच्या बिगारी कामगाराला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मे २०२४
मुंबई, – खाऊसाठी पैसे देऊन एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नैसगिक व अनैसगिंक लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच उत्तम नावाच्या एका ४३ वर्षांच्या आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. उत्तम हा बिगारी कामगार असून तो पिडीत मुलीच्या शेजारीच राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बारा वर्षांची पिडीत मुलगी मालाड परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच परिसरात उत्तम हा राहत असून तो बिगारी कामगार म्हणून काम करतो. एकाच परिसरात राहत असल्याने दोन्ही कुटुंबिय एकमेकांच्या परिचित आहेत. १५ मे ते २४ मे या कालावधीत त्याने पिडीत मुलीला खाऊसाठी पैसे दिले होते. पैसे देताा त्याने तिचे कपडे काढून तिच्याशी अश्लील चाळे केले. तिच्यावर नैसगिंक व अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. जिवाच्या भीतीने या मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र अलीकडेच तिच्या पोटात वेदना होऊ लागले. त्यामुळे तिच्या पालकांनी तिच्याकडे विचारणा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या माहितीने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी बांगुरनगर पोलीस ठाण्यात धाव घऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पिडीत मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी उत्तमविरुद्ध ३७६ (२), (एन), ३७६ (३), ३७७, ५०६ भादवी सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला मेडीकलसाठी पाठविण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.