मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जून २०२४
मुंबई, – शारीरिक संबंधातून गरोदर राहिल्याचा आरोप करुन मनाविरुद्ध जबदस्तीने बलात्कार केल्याची पोलिसांत तक्रार करु अशी धमकी देत एका महिलेसह तिच्या भावाने खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार कुलाबा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या दोघाविरुद्ध कुलाबा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुष्पा नारायण इंगळे आणि देवानंद दगडू गव्हाळे अशी या दोघांची नावे असून या दोघांनी आतापर्यंत खंडणी स्वरुपात तक्रारदाराकडून ४१ लाख रुपये वसुल केल्याचे बोलले जाते. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत कुलाबा पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
३२ वर्षांचे तक्रारदार नवी मुंबईतील खारघर परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते भांडुप येथील बिल्डरकडे सुपरवायझर म्हणून कामाला आहे. २०१६ साली त्यांची पुष्पा इंगळे या महिलेशी ओळख झाली होती. ती त्यांच्या भांडुप येथील कार्यालयात फ्लॅटबाबत विचारणा करण्यासाठी आली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा भाऊ देवानंद गव्हाळे हादेखील होता. पुष्पा ही विवाहीत असून तिला दोन मुले आहे. तिचा पती दुबई येथे कामाला आहे. तिचा बजेट कमी असल्याने तिने त्यांना कमी किंमत फ्लॅट मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर ती त्यांना सतत कॉल करुन फ्लॅटविषयी बोलत होती. याच दरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली होती. ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. याच दरम्यान तिने तिचे त्यांच्यावर प्रेम असल्याचे सांगितले होते. तिचा पती दुबई येथे कामाला असल्याने तो वर्षांतून एकदा घरी येत होता. तिला कौटुंबिक सुख मिळत नाही, त्यामुळे तिने त्यांना लग्नाविषयी विचारणा केली होती. मात्र त्यांनी ते विवाहीत असल्याने तिच्याशी लग्न करणार नाही असे सांगितले होते. मे २०१९ रोजी ती त्यांच्यासोबत चेंबूर येथील एका हॉटेलमध्ये आली होती. तिथे त्यांनी एक रुम बुक केला हातेूा. २०२१ रोजी पुष्पा आणि देवानंदने त्यांना त्यांच्या घरी बोलावून घेतले. यावेळी तिने ती गरोदर असून तिच्याशी लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. यावेळी त्यांनी त्यांच्यात शारीरिक संंबंध आले नाहीतर ती गरोदर कशी राहिली. यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. हा वाद सुरु असताना देवानंदने त्यांच्याविरुद्ध चेंबूर पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार करुन त्याचे आयुष्य उद्धवस्त करण्याची धमकी दिली. चेंबूर पोलीस ठाण्यात त्याची चांगली ओळख आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार करु नये असे वाटत असल्याने त्यांना ५० लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. या प्रकाराने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्याने एक महिन्यांची मुदत मागून हा प्रकार त्यांच्या वडिलांसह इतर नातेवाईकांना सांगितला.
बदनामीच्या भीतीने त्यांनी त्याला काही रक्कम देण्याचा सल्ला दिला होता. पैशांसाठी ते दोघेही त्यांना सतत ब्लॅकमेल करत होते. त्यामुळे त्यांनी तिला टप्याटप्याने तीस लाख रुपये, साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, संगणक, मॉनिटर, जून २०२२ पासून दरमाह २२ हजार रुपयांप्रमाणे ५ लाख २८ हजार असे ४१ लाख १८ हजार रुपये दिले होते. मात्र ही रक्कम देऊन त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी होत होती. पैसे दिले नाहीतर त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा करण्याची धमकी देत होते. या धमकीमुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सततच्या ब्लॅकमेलसह खंडणीसाठी मिळणार्या धमकीला कंटाळून त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. घडलेला प्रकार कुलाबा पोलिसांना सांगून त्यांनी पुष्पा इंगले आणि तिचा भाऊ देवानंद गव्हाळे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी ३८४, ३८९, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.