मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जून २०२४
मुंबई, – फेअर प्ले बेटींग ऍपप्रकरणी राज्य सायबर सेलकडून तपास सुरु असतानाच आता ईडीने स्वतंत्रपणे तपास सुरु केला आहे. या संपूर्ण प्रकरणात कोट्यवधी रुपयांचे मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप झाल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर आता ईडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईसह पुण्यातील एकोणीस ठिकाणी गुरुवारी एकाच वेळेस ईडीने छापेमारी करुन सुमारे आठ कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात महत्त्वाच्या दस्तावेजाचा समावेश आहे. याच प्रकरणात लवकरच गुन्हा दाखल करुन दोषीवर कारवाई होणार आहे.
फेअर प्ले बेटींग ऍपप्रकरणी वायकॉम १८ कंपनीच्या तक्रार अर्जावरुन राज्य सायबर सेलने स्वामीत्व हक्कांचे उल्लघंन कंपनी कंपनीची कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविल्याचा आरोप करताना तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. वायकॉम १८ कंपनीकडे आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे अधिकृत हक्क होते. मात्र फेअर प्ले या ऍपवर आयपीएल सामन्याचे अनधिकृतपणे प्रक्षेक्षण दाखविण्यात आले होते. त्यातून वायकॉम १८ कंपनीला सुमारे शंभर कोटीचे नुकसान झाले होते. बॉलीवूड कलाकारांची या ऍपची जाहिरात केली होती. त्यामुळे जाहिरात करणार्या बॉलीवूड कलाकारांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. या तपासादरम्यान या संपूर्ण प्रकरणात कोट्यवधी रुपयांची मनी लॉड्रिंग झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याचा ईडीने स्वतंत्रपणे तपास सुरु केला होता. याच तपासाचा एक भाग म्हणून ईडीच्या अधिकार्यांनी मुंबईसह पुण्यातील एकोणीस ठिकाणी एकच वेळेस छापेमारी केली होती. या कारवाई ईडीने बँक फंड, डिमॅट खात्यासह लक्झरी घड्याळ, महत्त्वाचे दस्तावेज, डिजिटल उपकरणे, आदी सुमारे आठ कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची आता ईडीने चौकशी सुरु असून चौकशीनंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होणार आहे. फेअर प्लेने दुबईसह इतर विदेशी संस्थेमार्फत प्रसिद्ध व्यक्तींचे प्रतिनिधीत्व करणार्या भारतीय एजन्सीसोबत करार केल्याचे ईडीच्या चौकशीतून उघडकीस आले आहे.
भारतीय एजन्सींनी फेअर प्लेच्या जाहिरातीसाठी करार अंमलात आणण्यापूर्वी कोणतीही कायदेशीर काळजी घेतली नव्हती. त्यासाठी कंपनीने मोठ्यज्ञा प्रमाणात विविध बोगस शेल बँक खात्याद्वारे निधी गोळा जमा केला होता. जो शेल संस्थाच्या बँक खात्याद्वारे निधी जटील वेबद्वारे स्तरीत केला होता आणि नंतर बोगस बिलिंगमध्ये सामिल असलेल्या फार्मा कंपन्यांमध्ये जमा झाला होता. कंपनीने त्यांचा निधी दुबई, हॉंगकॉंग, चीन, एसएआरसह इतर देशांमध्ये शेल संस्थाना पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यासाठी कंपनीकडून चारशेहून अधिक बँक खात्याचा वापर झाला होता. या ऍपने अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मोठ्या प्रमाणात बेटींग घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच चौकशी सुरु असून दोषीवर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जाते.