सोळा वर्षांच्या कॉलेज अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
चेंबूर येथील घटना; २१ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जून २०२४
मुंबई, – सोळा वर्षांच्या एका अल्पवयीन कॉलेज मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ओमकार नावाच्या एक २१ वर्षांच्या आरोपी प्रियकराविरुद्ध आरसीएफ पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवसांपूर्वीच या मुलीची राजावाडी हॉस्पिटलमध्ये प्रसुती झाली असून तिने एका बाळाला जन्म दिला होता. या दोघांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१६ वर्षांची पिडीत मुलगी चेंबूर येथे राहत असून सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते. चेंबूर परिसरात राहणार्या ओमकारशी तिची ओळख झाली आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले होते. सप्टेंबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत ओमकारने तिला त्याच्या राहत्या घरी बोलावून तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. त्यामुळे तिला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी १० जूनला तिची नॉर्मल प्रसुती झाली असून तिने एका बाळाला जन्म दिला आहे. पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याने ही माहिती नंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून आरसीएफ पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पिडीत मुलीच्या जबानीवरुन पोलिसांनी ओमकारविरुद्ध ३७६ भादवी सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत अद्याप त्याला अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.