लिव्ह इन पार्टनरवर हल्ला करुन लैगिंक अत्याचारासह खंडणीची मागणी

संबंध तोडले म्हणून पॉर्न साईटवर फोटो व्हायरल करुन बदनामी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जून २०२४
मुंबई, – लिव्ह पार्टनर तरुणीवर जीवघेणा हल्ला करुन तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचारासह खंडणीची मागणी करुन, अश्‍लील फोटो पॉर्न साईटवर व्हायरल करुन तिची बदनामी केल्याप्रकरणी वैभव योगेंद्र सिंग या आरोपी प्रियकराविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी भादवीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पुढील तपास पवई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पळून गेलेल्या प्रियकराच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

घाटकोपर परिसरात पिडीत २५ वर्षांची तरुणी राहत असून तिचे गेल्या वर्षी अंधेरी येथे राहणार्‍या वैभवशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ते दोघेही नंतर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. अनेकदा ते दोघेही साकिनाका येथील हॉटेल अहलन इंटरनॅशनलमध्ये भेटत होते. या भेटीदरम्यान वैभवने पिडीत तरुणीवर जबदस्तीने नैसगिंक व अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. आपण लग्न करणार आहोत असे सांगून त्याने तिच्यावर मार्च ते डिसेंबर २०२३ या कालावधीत अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. याच दरम्यान त्याने तिच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. सुरुवातीला तिने त्याला पैशांची मदत केली, नंतर त्याची मागणी वाढत गेली. नंतर तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तो तिचा मानसिक शोषण करुन तिला सतत मारहाण करत होता, काही महिन्यांपूर्वी गळा आवळून त्याने तिच्या हत्येचा प्रयत्न केला होता. तिचा ऍपल कंपनीचा आयफोन खोडसाळपणे तोडून तिचे अश्‍लील फोटो पॉर्न वेबसाईटवर व्हायरल करुन तिची बदनामी केली होती. त्यामुळे तिने त्याच्याशी असलेले अनैतिक संबंध तोडून टाकले होते. तरीही त्याच्याकडून तिचा मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता.

या छळाला कंटाळून तिने पार्कसाईट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून वैभवविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपी प्रियकराविरुद्ध ३०७, ३७७, ३७६, ३७६ (२), (एन), ३९२, ३८५, ३२४, ३२३, ५०६, ४२७ भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा साकिनाका परिसरात घडल्याने त्याचा तपास पवई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असून लवकरच वैभवला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page