लग्नाच्या आमिषाने पंधरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार
गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जून २०२४
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच प्रियकराने लैगिंक अत्याचार केला. पिडीत मुलगी गरोदर राहिल्यांनतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी जिग्नेश नावाच्या १८ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. ३२ वर्षांची तक्रारदार महिला ही घाटकोपर येथे राहत असून घरकाम करते. पंधरा वर्षांची पिडीत तिची मुलगी आहे.
तक्रारदार महिलेची वहिनी कामावर जात असल्याने तिच्या मुलांचा सांभाळ तिची मुलगी करत होती. तिला शाळेत सोडण्याची तिच्यावर जबाबदार होती. काही महिन्यांपूर्वी शाळेतच तिची जिग्नेशशी ओळख झाली होती. त्याने तिला प्रपोज करुन लग्नाची मागणी घातली होती. ऑक्टोंबर २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान त्याने तिला त्याच्या घरी आणून तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. अलीकडेच या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी डॉक्टरकडे नेण्यात आले होते. तिथे तपासणी केल्यानंतर ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी तिच्या आईला सांगितले होते. त्यानंतर तिच्याकडून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर या महिलेने घाटकोपर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून जिग्नेशविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर आरोपी प्रियकराविरुद्ध पोलिसांनी ३७६, ३७६ (२), (एन) भादवी सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. जिग्नेश हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.