राज्य पोलीस दलातील ७८ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या
दोन उपायुक्तर तर ७६ सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जुलै २०२४
मुंबई, – राज्य पोलीस दलातील ७८ पोलीस अधिकार्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात पोलीस उपायुक्त तर ७६ सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ७८ पोलीस अधिकार्यांच्या बुधवारी बदल्याचे आदेश अवर सचिव संदीप गोरखनाथ ढाकणे यांनी जारी केले होते. या बदल्यांमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या दोन पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे.
डी. आर. कुलकर्णी यांची रत्नागिरीच्या पोलीस अधिक्षक, व्ही. जी. मगर यांची पुणे शहर पोलीस उपायुक्त, रमेश बबन वेठेकर व पद्माकर विश्वनाथ पारखे यांची पुणे रा. रा. पोलीस बल गट क्रमांक एकच्या सहाय्यक समादेशक, शहादेव दादाराव सानप यांची दौंड रा. रा. पोलीस बल प्रशिक्षण केंद्राच्या उपप्राचार्य, महादेव रामचंद्र गावारी यांची पुण्याच्या रा. रा. पोलीस बल गट क्रमांक पाचच्या सहाय्यक समादेशक, किशर पुरभाजी येरेमुरे यांची छत्रपती संभाजीनगरच्या रा. रा. पोलीस बल गट क्रमांक १४ च्या सहाय्यक समादेशक, संजय मारुती भोसले यांची दौंडच्या रा. रा. पोलीस बल गट क्रमांक सातच्या सहाय्यक समादेशक, अरविंद धोंडिबा अल्हाट यांची पुणे अप्पर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस उपअधिक्षक, संतोष जगन्नाथ जोशी यांची छत्रपती संभाजीनगर, बिनतारी संदेश विभागाच्या पोलीस उपअधिक्षक, निलेश मनोहर पांडे यांची अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, निलेश नानाभाऊ सोनावणे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरार अप्पर पोलीस अधिक्षक, अभिजीत तानाजी धाराशिवकर यांची पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी, पद्मजा अमोल बढे यांची नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त, सुधीर अशोक खिरडकर यांची सोलापूर शहर सहाय्यक पोलीस आयुक्त, आरती भागवत बनसोडे यांची पुण्याच्या महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीत अप्पर पोलीस अधिक्षक, प्रांजली नवनाथ सोनावणे पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त, निता अशोक पाडवी यांची मुंबई शहर सहाय्यक पोलीस आयुक्त, सिद्धेश्वर बाबूराव धुमाळ यांची अमरावती उपविभागीय पोलीस अधिकारी, संगीता राजेंद्र निकम, अनुराधा विठ्ठल उदमले यांची नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त, अलुरकर नयन पवनकुमार यांच नागपूर गुन्हे अन्वेषण विभाग अप्पर पोलीस अधिक्षक, अरुण दामोदर पाटील यांची मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अप्पर पोलीस अधिक्षक, अमोल अशोक मांडवे यांची पुणे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी, भाऊसाहेब कैलास ढोले यांची नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त, सुरेश आप्पासाहेब पाटील यांची मुंबई पोलीस उपअधिक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कविता गणेश फडतरे यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी पोलीस उपअधिक्षक, राहुल सुभाष गायकवाड यांी अमरावती उपविभागीय पोलीस अधिकारी, सुदर्शन प्रकाश पाटील यांची छत्रपती संभाजीनगर सहाय्यक पोलीस आयुक्त, व्यकंटेश श्रीकृष्ण देशपांडे यांची पुणे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती पोलीस उपअधिक्षक, पूजा बाळासाहेब गायकवाड यांची नागपूर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधिक्षक, भाऊसाहेब गोविंदराव पठारे, राहुल बाळू आवारे, अजय रतनसिंग परमार, अनुजा अजीत देशमाने, सुभाष आप्पासाहेब निकम यांची पुणे सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशांत पंढरीनाथ राजे, प्रकाश हिंदुराव चौगुले, शैलेश दिगंबर पासलवार मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त, इंद्रजीत किशोर कारले यांची नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त, हेमंत नरहरी शिंदे, सूर्यकांत दत्तात्रय जगदाळे, अंबादास शंकर भुसारे यांची हिंगाली उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रकांत दत्तात्रय भोसले, धनाजी बाबूराव क्षीरसागर यांची ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त, ललिता लक्ष्मण गायकडवाड, सरदार पांडुरंग पाटील, कविता निवृत्ती गायकवाड व मिनाक्षी राजण राणे यांची मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागच्या अप्पर उप-आयुक्त, प्रदीप उत्तम ढोले यांची नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त, सुहास गोविंदराव हेमाडे, संध्या विजय भिसे, शरद निवृत्ती ओहोळे यांची ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त, दिपक श्रीमंत निकम, नूतन विश्वनाथ पवार यांची पुणे सहाय्यक पोलीस आयुक्त, सुनिल देवगीर गोसावी यांची नाशिक दोनच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपअधिक्षक, संतोष विठ्ठललराव खांडेकर यांची अमरावती ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, सुनिल बाबासाहेब कुराडे यांची पिंपरी-चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्त, सुनिल दिगंबर घुगे यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या पोलीस उपअधिक्षक, धनंजय सिद्राम जाधव यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग, किरणबाला जितेंद्रसिंह पाटील यांची छत्रपती संभाजीनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक, सुनिल बन्सीलाल पुजारी यांची पुणे ग्रामीण हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, अशोक नामदेव थोरात यांची अमरावती ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, मनोज धोंडीराम पगारे यांची छत्रपती संभाजीनगर सहाय्यक पोलीस आयुक्त, विठ्ठल खंडजी कुबडे, गितांजली कुमार दुधाणे यांची नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त, नवनाथ केशवराव घोगरे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरारच्या सहाय्यक पोलीस आयुक्त गुरुनाथ व्यकंटेश नायडू यांची नाशिक पोलीस अकादमीच्या पोलीस उपअधिक्षक, आण्णासाहेब बाळासाहेब घोलप यांची दौडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, संजय रतन बांबळे यांची धुळेच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, सोनाली प्रशांत ढोले यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधिक्षक, स्वप्निल चंद्रशेखर जाधव यांची सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपअधिक्षक, पद्मावती शिवाजी कदम यांची कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे वाचक, शितल बाबूराव जानवे यांची कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक, आबेद रौफ सैय्यद यांची मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्त, आणि सुनिल प्रताप शिंदे यांची नागपूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढली करण्यात आली आहे.