मुंबई युनिटच्या डीआरआयची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ जुलै २०२४
मुंबई, – रक्तचंदनाची तस्करी करणार्या एका आंतरराज्य रॅकेटचा महसूल गुप्तचर विभागाच्या (डीआरआय) मुंबई युनिटच्या अधिकार्यांनी पर्दाफाश करुन पाच आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. त्यात निर्यातदार, कमिशन ब्रोकर, गोदाम व्यवस्थापक आणि वाहतूकदारांचा समावेश आहे. या कारवाईत या अधिकार्यांनी सुमारे आठ कोटीचा रक्तचंदनाचा साठा जप्त केला. यातील दोन मेट्रीेक टन रक्तचंदन लवकरच विदेशात पाठविण्यात येणार होता. अटकेनंतर पाचही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रक्तचंदनाची तस्करी करणार्या टोळीचा यापूर्वीही डीआरआयच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला होता. तरीही काहीजण न्हावा-शेवा बंदरात रक्तचंदनाची तस्करी करत असल्याची माहिती मुंबई युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी या अधिकार्यांनी एका कंटेनरला ताब्यात घेतले होते. या कंटनेरची तपासणी केली असता त्यात या अधिकार्यांना पॉलिश केलेल्या ग्रेनाईट स्लब आणि सिमेंटच्या विटा सापडल्या. त्यामागे सहा टन टन रक्तचंदन लपविण्यात आले होते. हा साठा जप्त केल्यानंतर या अधिकार्यांनी पुढील कारवाईला सुरुवात केली होती. त्यासाठी डीआरआयचे काही विशेष पथक अहमदनगर, नाशिक आणि हैद्राबाद येथे टिम पाठविली होती. यावेळी नाशिक येथील एका गोदामात या अधिकार्यांनी दोन मेट्रीेक टन रक्तचंदनाचा साठा जप्त केला. हा साठा लवकरच विदेशात पाठविण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच हा साठा जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या रक्तचंदनाची किंमत सुमारे आठ कोटी रुपये आहेत. त्यानंतर या अधिकार्यांनी वेगवेगळ्या परिसरातून पाचजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध रक्तचंदनाच्या तस्करीच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर या पाचही आरोपींना लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. रक्तचंदनाची तस्करी करणारी ही एक टोळी असल्याचे उघडकीस आले असून या टोळीच्या इतर आरोपींच्या अटकेसाठी डीआरआयने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही टोळी रक्तचंदनाची तस्करी करत होती. नंतर हा साठा विदेशात पाठविला जात होता. अटक आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.