१४७ गुंतवणुकदारांची १८ कोटींच्या फसवणुकप्रकरणी आरोपीस अटक
मुदत ठेवीवर आकर्षक व्याजाच्या आमिषाने अनेकांना गंडा घातला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ जुलै २०२४
मुंबई, – मुदत ठेवीवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून १४७ गुंतवणुकदारांची सुमारे १८ कोटी रुपयांच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. व्यकंटरमनन गोपालन असे या आरोपीचे ाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने गुरुवार ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होता गोपालन हा गेल्या एक वर्षांपासून स्वतचे अस्तित्व लपविण्यासाठी विविध ठिकाणी राहत होता, अखेर एक वर्षांनी त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गोपालन हा मूळचा तामिळनाडूच्या चेन्नईचा रहिवाशी असून त्याच्या मालकीची जी. व्ही आर एक्सपोर्ट ऍण्ड इंपोर्ट नावाची एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीचे सांताक्रुज येथील वाकोला, दलखानिया हाऊसमध्ये एक शाखा आहे. शेतमालाची आयात आणि निर्यातकरण्याचा उद्योग असल्याची बतावणी करुन त्याने त्याचा व्यवसाय वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक आवश्यक होती. कंपनीच्या गुंतवणुकीच्या मुदत ठेवीवर त्याने मासिक सात ते दहा टक्के व्याजासह परतावा देण्याची योजना सुरु केली होती. या योजनेत गुंतवणुकदारांना विविध प्रलोभन दाखवून त्यांना कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. डिसेंबर २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत त्याच्या कंपनीच्या मुदत ठेव योजनेत १४७ जणांनी सुमारे अठरा कोटींची गुंतवणुक केली होती. काही महिने गुुंतवणुकदारांना व्याजाची रक्कम दिल्यानंतर त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. सांताक्रुज येथील कार्यालयाला टाळे लावून गोपालन हा पळून गेला होता. हा प्रकार नंतर संबंधित गुंतवणुकदारांच्या निदर्शनास येताच त्यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर व्यकंटरमनन गोपालनविरुद्ध पोलिसांनी ४०९, ४२० भादवी ३, ४ एमपीआयडी कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच गोपालन हा पळून गेला होता. गेल्या एक वर्षांपासून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच तो आंधप्रदेशच्या तिरुपती परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर सहपोलीस आयुक्त निशिथ मिश्र, पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, सहाय्यक पोलीस आयुक्त गोकुळसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बागल यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संजय लोंढे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम, पोलीस हवालदार नलावडे, आव्हाड यांनी तिरुपती परिसरात दोन ते तीन दिवस साध्या वेशात पाळत ठेवून गोपालन याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. गुंतवणुकदारांच्या गुंतवणुक रक्कमेचा त्याने कशा प्रकारे विनीयोग केला, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.