दहा आयपीएससह सोळा पोलीस अधिकार्यांच्या बदल्या
अप्पर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षकाचा समावेश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ जुलै २०२४
मुंबई, – राज्य पोलीस दलातील सोळा पोलीस अधिकार्यांचा सोमवारी सायंकाळी गृहविभागाने बदल्या केल्या. त्यात दहा अप्पर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या दहा आयपीएस अधिकार्यासह सहा पोलीस उपअधिक्षक-सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. या सर्व अधिकार्यांना त्यांच्या नव्याने नियुक्त केलेल्या बदलीच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.
सोमवारी गृहविभगाचे सहसचिव व्यकंटेश भट यांनी सोळा पोलीस अधिकार्यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते. त्यात दहा अप्पर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि सहा पोलीस उपअधिक्षक-सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश होता. बदली झालेल्यांमध्ये पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि परिवहन विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांची अप्पर पोलीस महासंचालक नियोजन आणि समन्वय विभाग, राज्याचे विशेष कृती विभागचे अप्पर पोलीस महासंचालक प्रविण साळुंखे यांची लोहमार्ग मुंबईच्या अप्पर पोलीस महासंचालक, वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक सुरेश मेखला यांची अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक विभाग, महिला आणि बालअत्याचार प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक दिपक यांची पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि परिवहन विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक, कारागृह आणि सुधारसेवा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांची विशेष कृती विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक, कायदा आणि सुव्यवस्थेचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूरच्या सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांची नागरी हक्क संरक्षण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्रेचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची कायदा व सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, पुणे गुन्हे अन्वेषण विभागचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांची पुणे शहर सहपोलीस आयुक्त, राज्य गुन्हे अभिलेख विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डी. के पाटील-भुजबळ यांची नागपूर परिक्षेत्र विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर गुन्हे अन्वेषण विभागचे अप्पर पोलीस अधिक्षक अनिल बाबूराव शेवाळे यांची पुणे एटीएस, नाशिक ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेचे धन्यकुमार चांगदेव गोडसे यांची पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबईचे पोलीस उपअधिक्षक दादाहरी केशव चौरे यांची परतूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, छत्रपती संभाजीनगरचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक विजय तुकाराम पाटील यांची पाटण उपविभागीय पोलीस अधिकारी, यवतमाळच्या मुख्यालयाचे पोलीस उपअधिक्षक मनोजर नरसप्पा पाटील यांची पालघरच्या अनुससूचित जमाती प्रमाणपत्र विभागाच्या पोलीस उपअधिक्षक, मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुधाकर चंद्रभान सुराडकर यांची नाशिक शहरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.