सलग दुसर्या दिवशी आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या
सात वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या गृहविभागाकडून बदल्या
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ जुलै २०२४
मुंबई, – सोमवारी दहा आयपीएस अधिकार्यांसह सोळा पोलीस अधिकार्यांची बदलीनंतर मंगळवारी दुसर्या दिवशी अन्य सात आयपीएस अधिकार्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहे. सायकाळी गृहविभागाचे व्यंकटेश भट यांनी या बदलीचे बदलीचे आदेश जारी केले होते.
सोमवारी गृहविभागाने सोळा पोलीस अधिकार्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. त्यात दहा वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांसह सहा पोलीस उपअधिक्षक-सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश होता. सोमवारनंतर मंगळवारी सायंकाळी आणखीन सात वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत एच महावरकर यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, ठाण्याचे पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डी. टी शिंदे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरार विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्त, ठाण्याचे प्रशासन विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय बी जाधव यांची ठाणे पूर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरारचे अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत व्ही पाठक यांी ठाणे प्रशासन विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्त, राज्याच्या राज्य राखीव पोलीस बलाचे पोलीस उपमहानिरीक्षक अभिषेक भगवान त्रिमुखे यांची मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शहाजी उमाप यांची नांदेडच्या पोलीस उपमहानिरीक्षक तर नागपूरचे दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी टी राठोड यांची मुंबईच्या विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.