इमारतीवरुन पडून नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

खेळताना खिडकीची ग्रिल ओपन होऊन अपघात

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० जुलै २०२४
मुुंबई, – इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरुन आशिया मानसिंग विश्‍वकर्मा या नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. खेळताना खिडकीची ग्रील ओपन झाली आणि आर्या ही तिसर्‍या मजल्यावरुन पडल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांनी सांगितले. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

ही घटना मंगळवारी ९ जुलैला रात्री आठ वाजता कांदिववलीतील डहाणूकरवाडी, गावठाण, स्टिल स्टोन इमारतीमध्ये घडली. या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील रुम क्रमांक ३०३ मध्ये आशिया ही तिच्या पालकांसोबत राहत होते. तिची आई-वडिल रोजदांरीवर काम करत होते तर ती जवळच्या शासकीय शाळेत शिकत होती. मंगळवारी रात्री आठ वाजता ती तिच्या भावडांसोबत घरातच खेळत होती. खेळता खेळता ती खिडकीजवळ आली. यावेळी खिडकीची ग्रील ओपन झाली आणि ती तिसर्‍या मजल्यावरुन खाली पडली होती. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच रात्री दिड वाजता तिचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तिच्या पालकांची जबानी नोंदविण्यात आली असून त्यांनी या घटनेमागे कोणावर संशय व्यक्त केला नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नाही. खिडकीची ग्रील अचानक ओपन झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page