पोलीस शिपाई अमीत परब यांचे निधन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२४
मुंबई, – नागपाडा परिवहन विभागात कार्यरत असलेले पोलीस शिपाई अमीत चंद्रशेखर परब यांचे सोमवारी दुपारी डेंगूसह टायफाईड आजाराने होकार्ड रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. अवघ्या ३२ व्या वर्षी अमीत परब यांच्या अचानक निघून जाण्याने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

अमीत देशमुख हे मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. वरळीतील सशस्त्र पोलीस दलात कार्यरत असलेले अमीत यांना प्रतिनियुक्तीवर नागपाडा येथील परिवहन विभागात बदली दाखविण्यात आली होती. ३० जूनला घरी असताना अचानक त्यांना चक्कर आणि ताप आला होता. त्यामुळे त्यांना मुंबई सेंट्रल येथील होकॉर्ड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांना डेंगूसह टायफाईड झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच दुपारी पावणेदोन वाजता त्यांचे निधन झाले. ही माहिती नंतर त्यांच्या त्यांची आई अनिता चंद्रशेखर परब यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असलेले पोलीस हवालदार कुंभार, पोलीस शिपाई खरात यांना देण्यात आली. वरळीतील जिजामाता नगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातील त्यांचे सहकारी, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page