वेश्याव्यवसाय करणार्या २२ वर्षांच्या तरुणीवर लैगिंक अत्याचार
२८ वर्षांच्या आरोपीसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२४
मुंबई, – वेश्याव्यवसाय करणार्या एका २२ वर्षांच्या तरुणीवर तिच्याच परिचित तरुणाने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार भांडुप परिसरात उघडकीस आला आहे. याकामी आरोपीला त्याच्या लिव्ह इन मैत्रिणीने मदत केली होती. त्यामुळे २८ वर्षांच्या आरोपी तरुणासह मैत्रिणीविरुद्ध भांडुप पोलिसांनी लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिडीत तरुणी ही मूळची अहमदनगरची रहिवाशी असून ती सध्या भांडुप परिसरात राहते. नोकरीसाठी ती अहमदनगर येथून मुंबईत आली होती, काही महिने ती तिच्या मावशीकडे राहिली. मात्र बरेच प्रयत्न करुनही तिला काम मिळाले नव्हते. त्यामुळे आरोपीच्या मैत्रिणीसोबत तिच्या राहत्या घरी राहत होती. तिथे त्या दोघीही वेश्याव्यवसाय करत होत्या. तिची मैत्रिण इम्रान ऊर्फ राजू (२८) याच्यासोबत लिव्ह ऍण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होती. गुरुवारी रात्री उशिरा तिच्या मैत्रिणीने तिला इम्रानला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहे. तुझी इच्छा असेल तर तू त्याच्यासोबत संबंध ठेवू शकतेस असे सांगितले. मात्र तिने त्यास नकार दिला होता. काही वेळानंतर इम्रान हा बिअरसह ताडी पिऊन घरी आला आणि त्याने तिच्याशी अश्लील लगट करण्याचा प्रयत्न करु लागला. त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिचे जबदस्तीने कपडे काढून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिनेही मद्यप्राशन केले होते, त्यामुळे तिला त्याचा विरोध करता आला नाही. याकामी इम्रानने तिच्या मैत्रिणीने मदत केली होती.
घडलेलला प्रकार तिने तिच्या परिचित एनजीओच्या पदाधिकार्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तिला साकिनाका येथील कार्यालयात आणले होते. तिथे घडलेला प्रकार सांगून तिने इम्रानसह तिच्या मैत्रिणीविरुद्ध तक्रार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे ते पदाधिकारी तिच्यासोबत भांडुप पोलीस ठाण्यात गेले. तिथे तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी इम्रानसह त्याची लिव्ह इन पार्टनर मैत्रिणीविरुद्ध लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.