मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२४
मुंबई, – पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित तरुणाने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संदेश नावाच्या एका अठरा वर्षांच्या आरोपी तरुणाला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंेदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४२ वर्षांचे तक्रारदार विलेपार्ले येथे राहत असून त्यांना पंधरा वर्षांची एक मुलगी आहे. याच परिसरात संदेश हा राहत असून तो पिडीत मुलीच्या परिचित आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने तिला प्रपोज केले होते. मार्च महिन्यांत तो तिला घेऊन त्याच्या घरी घेऊन आला होता. तिथेच त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे त्याने तिला सांगितले होते. त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला होता. काही दिवसांपासून तिच्या पोटात वेदना होऊ लागले, त्यामुळे तक्रारदाराने तिच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले होते. तिथे त्यांना ती गरोदर असल्याचे समजले. तिची चौकशी केल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी आरोपी तरुणाविरुद्ध विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संदेशविरुद्ध ३७६ (२), (प) भादवी सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.