मानसिक रुग्ण असलेल्या भिक्षेकरुची आत्महत्या

नो पार्किंग बोर्डाला गळफास घेऊन जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० फेब्रुवारी २०२४
मुंबई, – मानसिक रुग्ण असलेल्या नायर नावाच्या एका ३५ वर्षांच्या भिक्षेकरुने मंगळवारी पहाटे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नो पार्किंग बोर्डाला गळफास घेऊन त्याने जीवन संपविले. या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. याप्रकणी बोरिवली पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

नायर हा ३५ वर्षांचा तरुण बोरिवली परिसरातील फुटपाथवर राहत होता. दिवसभर भिक मागून तो फुटपाथवर झोपत होता. तो मानसिक रुग्ण होता. मंगळवारी पहाटे पाच वाजता बोरिवलीतील एस. व्ही रोडवरील पोलीस लॉकअपजवळील एका नो पार्किंग बोर्डाला नायरने बनियान आणि शर्टच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार एका पादचार्‍याच्या लक्षात येताच त्याने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. ही माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक काळे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी नयरला पोलिसांनी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. त्याचे मुंबईत कोणीही नातेवाईक राहत नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page