गुंगीच्या गोळ्या देऊन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
लैगिंक अत्याचारासह धमकी दिल्याप्रकरणी मित्राला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ जुलै २०२४
मुंबई, – पाय दुखत असल्याने अल्पवयीन मैत्रिणीला गुंगीच्या गोळ्या देऊन बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर तिच्याच मित्राने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह मारहाण करुन धमकी दिल्याप्रकरणी वाजिद नावाच्या एका आरोपी मित्राला देवनार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१८ वर्षांची पिडीत तरुणी ही गोवंडीतील देवनार परिसरात राहते. याच परिसरात वाजिद हा राहत असून तो तिचा चांगला मित्र आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत तिचा पाय दुखत होता. त्यामुळे तिने वाजिदला पाय दुखत असल्याचे सांगितले होते. त्यावर त्याने तिला एक गोळी गोळी दिली होती. ही गोळी खाल्यानंतर तिचे पाय दुखणे बंद होईल असे सांगितले. त्यामुळे तिने ती गोळी घेतली होती. मात्र गोळी खाल्यानंतर तिला गुंगी आली आणि ती बेशुद्ध पडली होती. याच संधीचा फायदा घेत त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. शुद्धीवर हा प्रकार लक्षात येताच त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर त्याने तिच्यावर पुन्हा लैगिक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी असे बजावून त्याने जिवे मारण्याची धमकी धमकी दिली होती. याच कारणावरुन त्याने तिला बेदम मारहाण केली होती. सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
मात्र वाजिदने मैत्रीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार देवनार पोलिसांना सांगून वाजिदविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारवरुन ३७६ (२), (एन), ३२८, ३२३, ५०६ भादवी सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. लैगिंक अत्याचाराच्या वेळेस पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपीविरुद्ध भादवीसह पोक्सोतर्ंगत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.