एमडी ड्रग्ज बनविणार्‍या आणखीन एका फॅक्टरीचा पर्दाफाश

नागपूरात डीआरआयची कारवाई; ७८ कोटीच्या ड्रग्जसह तिघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑगस्ट २०२४
मुंबई, – एमडी ड्रग्ज बनविणार्‍या आणखीन एका एमडी ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश करण्यात मुंबई युनिटच्या महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. नागपूर येथे केलेल्या कारवाईत या अधिकार्‍यांनी तीन आरोपींना अटक करुन सुमारे ७२ कोटीचा एमडी ड्रग्जसहीत इतर साहित्य जप्त केला आहे. एनडीपीएस कलमांतर्गत अटक केल्यानंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने डीआरआय कोठडी सुनावली आहे. त्यांची चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु होता.

गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांसह विविध तपास यंत्रणेने एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश करुन अनेक ड्रग्ज तस्करासह मुख्य आरोपींना गजाआड केले होते. तरीही विविध ठिकाणी एमडी ड्रग्ज फॅक्टरीत बनविण्यात येणार्‍या एमडी ड्रग्जची विक्री सुरु होती. अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध तपास यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना नागपूर येथे एमडी ड्रग्ज बनविण्याचा एक कारखाना सुरु असल्याची माहिती मुंबई युनिटच्या डीआरआयच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी संबंधित आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. ही माहिती काढताना या पथकाने नागपूपरच्या पाचपावती परिसरातील बांधकाम इमारतीजवळ विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच एका बांधकाम इमारतीमधील एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यात या अधिकार्‍यांना यश आले. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात ड्रग्ज फॅक्टरीच्या मुख्य आरोपीह फायानान्सर आणि कॅरिअरचा समावेश होता. घटनास्थळाहून या अधिकार्‍यांनी एमडी ड्रग्जच्या निर्मितीसाठी लागणारे सर्व आवश्यक रसायने, साहित्य आणि यंत्रसामुग्री असल्याचे दिसून आले. त्यासाठी विशेष यंत्र खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे तिथे एकाच वेळेस शंभर किलो पेक्षा अधिक एमडी ड्रग्ज बनविले जाऊ शकत होते.

या टोळीने फॅक्टरीत तयार केलेले ५१ किलो एमडी ड्रग्जसहीत इतर साहित्य असा ७८ कोटीचा मुद्देमाल या अधिकार्‍यांनी जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या तिघांनाही नंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा करण्यात आला असून गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींना या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना डीआरआय कोठडी सुनावली आहे. त्यांची चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपीचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आगामी काळात या गुन्ह्यांत इतर काही आरोपींच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page