तेरा व पंधरा वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
गोरेगाव, मालाड, अंधेरीतील घटना; दोन तरुणांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – शहरात गेल्या दोन दिवसांत तीन वेगवेगळ्या घटनेत तेरा व पंधरा वयोटातील तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालवणी, वनराई आणि एमआयडीसी पोलिसांनी तीन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन दोन तरुणांना अटक केली तर पळून गेलेल्या एका आरोपीचा शोध सुरु आहे. या तिन्ही घटना गोरेगाव, अंधेरी आणि मालाड परिसरात घडल्याचे पोलिसांनी सागितले.
पहिल्या गुन्ह्यांतील २४ वर्षांची तक्रारदार तरुणी तरुणी मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून पिडीत तिची तेरा वर्षांची बहिण आहे. याच परिसरात ३९ वर्षांचा आरोपी राहत असून तो तक्रारदार तरुणीचा भावोजी आहे. तिच्या मोठ्या बहिणीसोबत त्याचे लग्न झाले आहे. तिच्या आईचे एका मुस्लिम व्यक्तीशी दुसरे लग्न झाले होते. त्याच्यापासून तिला तेरा वर्षांची झाली होती. दहा वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून ही मुलगी त्यांच्यासोबत राहत होती. सोमवारी सकाळी आठ वाजता तिच्या भावोजीने तिच्याशी अश्लील संभाषण करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी घरात कोणीही नव्हते. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या बहिणीला सांगितला. त्यानंतर तिने मालवणी पोलीस ठाण्यात तिच्या भावोजीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ७९ भारतीय न्याय सहिता सहकलम १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसरी घटना अंधेरीतील पूनमनगर पीएमजीपी गार्डन परिसरात घडली. १५ वर्षांची तक्रारदार मुलगी ही अंधेरी परिसरात राहत असून ती शाळेत जाते. १९ वर्षांचा धु्रव हा तिचा मित्र असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजता ती पीएमजीपी गार्डनजवळ आली होती. यावेळी तिथे ध्रुव आला आणि त्याने तिला पुरुषांच्या वॉशरुममध्ये नेले. तिथेच त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिचे कपडण्याचा काढण्याचा प्रयत्न करुन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीतर तिचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने आरडाओरड केली होती. तिचा आवाज ऐकून तिथे काही लोक आले होते. या लोकांनी ध्रुवला ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याप्रकरणी या मुलीच्या तक्रारीवरुन धु्रवविरुद्ध पोलिसांनी ७४, ७५ भारतीय न्याय सहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर धु्रवला पोलिसांनी अटक केली.
तिसर्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत एका १९ वर्षांच्या तरुणाला वनराई पोलिसांनी अटक केली. ३२ वर्षांची तक्रारदार महिला गारेेगाव परिसरात राहत असून तिला तेरा वर्षांची मुलगी आहे. जुलै महिन्यांत ही मुलगी तक्रारदार महिलेच्या बहिणीकडे जात होती. यावेळी विग्नेश नावाच्या तरुणाने तिच्या परवानगीशिवाय तिची पाण्याची बाटली घेऊन त्यातून पाणी प्यायला. ते पाणी मी उष्ट केल्याचे सांगून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. १६ जुलै ते १२ ऑगस्ट २०२४ या कालावधीत तो सतत पाठलाग करुन तिचा मानसिक शोषण करत होता. तसेच मुलीच्या शेजारी राहणार्या एका तरुणीशी त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर स्थानिक रहिवाशांनी विग्नेशला पकडून वनराई पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याप्रकरणी तेरा वर्षांच्या मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विग्नेशविरुद्ध पोलिसांनी ७४, ७८, ७९ ३५१ (१) भारतीय न्याय सहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.