मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – कांदिवलीतील एका शाळेत अल्पवयीन मुलीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच धारावी पसिरात खाजगी क्लास घेणार्या एका शिक्षकानेच चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला मोाबईलवरुन अश्लील व्हिडीओ दाखवून, त्याचे हातपाय बांधून लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या शिक्षकाने अशाच प्रकारे इतर काही मुलांशी लैगिंक अत्याचार केला होता का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे.
धारावी परिसरात राहणारे तक्रारदार रिक्षाचालक असून आहेत. त्यांचा १४ वर्षांचा मुलगा शाळेत शिकत असून तो खाजगी शिकवणीसाठी याच परिसरात राहणार्या ३७ वर्षांच्या आरोपीच्या क्लासेसमध्ये जात होता. २१ जुलै ते २ ऑगस्ट २०२४ या कालावधीत क्लास संपल्यानंतर आरोपी शिक्षकाने इतर मुलांना घरी पाठविले, मात्र जास्त जास्तीचे क्लास घेण्याचा बहाणा करुन पिडीत मुलाला थांबवून ठेवले होते. याच दरम्यानतो त्याला मोबाईलवरुन अश्लील व्हिडीओ दाखवत होता. ते व्हिडीओ दाखवून तो त्याचे दोन्ही हातपाय बांधून त्याच्याशी नकोस कृत्य करत होता. त्याच्याकडून काही दिवसांपासून पिडीत मुलाचा लैगिंक अत्याचार सुरु होता. बदनामीच्या भीतीने या मुलाने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. दोन दिवसांपूर्वी त्याने त्याच्या वडिलांना क्लासमध्ये घडणार्या गोष्टींचा खुलासा करुन शिक्षकाना जाब विचारण्याची विनंती केली होती. मुलाकडून हा प्रकार समजताच तक्रारारांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे मुलासोबत ते धारावी पोलीस ठाण्यात आले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत शिक्षकाविरुद्ध ९५ भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच गुरुवारी रात्री उशिरा आरोपी शिक्षकाला अटक केली. अटकेनंतर शुक्रवारी दुपारी त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी सायंकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांसह विद्यार्थी, त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.