शहरात गेल्या २४ तासांत नऊ विनयभगांच्या गुन्ह्यांची नोंद
अकरा ते सतरा वयोगटातील सात मुलीसह मुलाचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मुंबई शहरात गेल्या २४ तासांत अल्पवयीन मुलांच्या विनयभंगाच्या नऊ गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्यात अकरा ते सतरा वयोगटातील सात मुलीसह एका अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सतरा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलासह सातजणांना पोलिसांनी अटक केली तर इतर दोन गुन्ह्यांतील आरोपींचा शोध सुरु आहे. अटकेनंतर अल्पवयीन मुलाला डोंगरी बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर इतर सहाजणांना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.
पहिली घटना मानखुर्द परिसरात घडली. तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत मानखुर्द येथे राहत असून ती घरकाम करते. तिला सोळा वर्षांची मुलगी आहे. रविवारी दुपारी बारा वाजता तिचा परिचित ३३ वर्षांचा आरोपी त्यांच्या घरी आला. यावेळी घरी तिची अल्पवयीन मुलगी एकटीच होती. त्याने तिला जोरात मिठी मारुन तिच्या ओठांचे, गालाचे आणि मानेचे चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला होता. तिने घडलेला प्रकार नंतर तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने आरोपीविरुद्ध मानखुर्द पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गंभीर दुखापत, हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत एक गुन्हा दाखल आहे.
दुसरी घटना दहिसर परिसरात घडली. तक्रारदार मुलगी ही सोळा वर्षांची असून ती दहिसरच्या कांदरपाड्यात राहते. मंगळवारी रात्री आठ वाजता ती तिच्या आत्याच्या घरातून जेवण घेऊन तिच्या घराच्या दिशेने जात होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिचा पाठलाग केला. काही कळण्यापूर्वीच त्याने तिचे केस पकडून तिला स्वतकडे ओढण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्यामुळे तिने जेवणाचा डब्बा त्याच्या तोंडावर जोरात मारला आणि तेथून पळ काढला. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तिसरी घटनेत वरळी येथे एका अकरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच शेजारी राहणार्या तरुणाने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. मंगळवारी रात्री पावणेदहा वाजता ही मुलगी जेवणाची भांडी साफ करत होती. यावेळी तिच्या शेजारी राहणार्या आरोपीने तिला दगड मारण्याचा धाक दाखवून तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिला त्याच्याकडे ओढून तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला होता. घडलेला प्रकार सांगून तिने वरळी पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस परिसरातून पोलिसांनी अटक केली.
चौथ्या घटनेत चेंबूर येथे एका चौदा वर्षांच्या मुलीला पाहून तिच्याच परिचित अल्पवयीन मुलाने फ्लाईंग किस करुन तिच्या चेहर्यावर सिगारेटचा धूर सोडून तिला हा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. काही वेळानंतर त्याने तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तिने टिळकनगर पोलिसात तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत सतरा वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.
पाचव्या घटनेत एका २० वर्षांच्या तरुणाला डोंगरी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन प्रेयसीचा पाठलाग करुन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. ही मुलगी एका मुलासोबत बोलत असल्याने आरोपीला तिचा राग होता. त्यामुळे तिने तिला मारहाण करुन तिच्याशी गैरवर्तन केले होते. त्यात तिच्या ओठाला दुखापत झाली आहे. ही मुलगी आणि आरोपी एकाच क्लासमध्ये शिकत असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. गुन्हा दाखल होताच त्याला बुधवारी रात्री पोलिसांनी अटक केली.
सहाव्या घटनेत मिसिंग आईची चौकशी करण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षांच्या मुलीशी अश्लील संभाषण करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार मुसाफिरखाना परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच लक्ष्मीकांत नावाच्या एका ४१ वर्षांच्या आरोपीस माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अटक केली. ही मुलगी कळवा येथे राहत असून गेल्या एक महिन्यांपासून तिची आई मिसिंग आहे. त्यामुळे ती सोमवारी मुसाफिरखाना येथे तिच्या आईची चौकशीसाठी आली होती. तिने लक्ष्मीकांतची भेट घेऊन त्याच्याकडे विचारणा केलीद होती. यावेळी त्याने तिला मला खुश कर, माझ्या घरी चल. तरच तुझ्या आईविषयी माहिती सांगेन असे अश्लील संभाषण करुन तिच्या खांद्याला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. दोन दिवसानंतर तिने पोलिसांत तक्रार केल्यानंतर आरोपीस पोलिसांनी अटक केली.
सातव्या घटनेत एका तेरा वर्षांच्या मुलीला अश्लील इशारे करुन तिचा पाठलाग केल्याप्रकरणी सौरभ शंकर मुजुमदार या २५ वर्षांच्या तरुणाविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सौरभ हा मूळचा कोलकाताच्या मुर्शिदाबादचा रहिवाशी आहे. ही मुलगी त्यांच्या कडधान्य विक्रीच्या स्टॉलवर असताना त्याने तिला पाहून अश्लील इशारे केले होते. तसेच तो तिचा पाठलाग करत होता. हा प्रकार तिने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी सौरभविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
आठव्या घटनेत एका सतरा वर्षांच्या मुलीचा पाठलाग करुन अज्ञात व्यक्तीने तिच्याशी अश्लील चाळे केल्याची घटना जुहू चौपाटीवर घडली. ही मुलगी विलेपार्ले येथे राहत असून ८ ऑगस्टला तिच्या मैत्रिणीसोबत जुहू चौपाटी येथे फिरायला गेली होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा पाठलाग करुन तिच्या पृष्ठभागावर नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. पंधरा दिवसानंतर तिने हा प्रकार जुहू पोलिसांना सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु आहे.
विक्रोळीत सोळा वर्षांच्या मुलावर अश्लील चाळे
अन्य एका घटनेत विक्रोळी येथे एका सोळा वर्षांच्या मुलावर अश्लील चाळे करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी छोटेलाल गौरीशंकर यादव या ५६ वर्षांच्या आरोपीस पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मुलगा विक्रोळी येथे राहत असून मंगळवारी सायंकाळी चार वाजता तो एका बेकरीसमोरुन जात होता. यावेळी बेकरीचालक छोटेलालने त्याला पाव-बिस्कीट आणि चॉकलेट देतो असे सांगून तिच्याशी अश्लील चाळे केले होते. घरी आल्यानंतर त्याने हा प्रकार त्याच्या आईला सांगताच तिने त्याच्याविरुद्ध पार्कसाईट पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी बेकरीचालक छोटेलाल यादवला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.