मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑगस्ट २०२४
मुंबई, – तीन व चौदा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर त्यांच्याच शेजारी राहणार्या एका नराधमाने अश्लील चाळे करुन लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच रहिम नावाच्या एका ३५ वर्षांच्या आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
३२ वर्षांची तक्रारदार महिला कांदिवली परिसरात राहत सून तिला तीन वर्षांची मुलगी आहे. ८ ऑगस्टला रात्री आठ वाजता ही महिला घरात काम करत होती तर तिची मुलगी घरासमोर खेळत होती. काम संपल्यानंतर ती बाहेर आली असता तिला तिची मुलगी दिसली नाही. त्यामुळे ती आरोपीच्या घराजवळ गेली होती. यावेळी तिला आरोपी तिच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करत असल्याचे दिसून आला. हा प्रकार पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने तिच्या मुलीला ताब्यात घेतले आणि आरोपीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. काही वेळानंतर त्याने तिला शिवीगाळ करुन तेथून पलायन केले होते. हा प्रकार तिने एका महिलेला सांगितला होता. यावेळी तिने तिच्या चौदा वर्षांच्या मुलीशी आरोपीने अशाच प्रकारे अश्लील चाळे केले होते. तिची मुलगी घराच्या दिशेने येत असताना आरोपीने स्वतच्या पॅण्टची चैन उघडून तिच्याकडे अश्लील इशारे केले होते.
या घटनेनंतर या दोन्ही महिलांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी ६४ (१), ७५ ३५२, भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ६, ८, १२ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांना आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पळून गेलेल्या रहिमला गुरुवारी रात्री उशिरा समतानगर पोलिसांनी कांदिवली परिसरातून अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.