मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन एका ४२ वर्षांच्या इस्टेट एजंटला बदनामीची धमकी देऊन खंडणीसाठी धमकाविणार्या त्रिकुटास एमएचबी पोलिसांनी अटक केली. आयुब रेहमान खान, जितेंद्र नारायण पटेल आणि सुदर्शन विभीषन चंदारे अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवार २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांनी त्यांच्या मैत्रिणीची माहिती त्याच्या पत्नीला सांगून त्यांची बदनामी धमकी देऊन पंधरा लाखांची मागणी करुन दहा लाख रुपये पलायन केले होते. त्यापैकी सात लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित रक्कम लवकरच त्यांच्याकडून जप्त केली जाणार आहे.
४२ वर्षांचे तक्रारदार बोरिवलीतील आयसी कॉलनीत राहत असून इस्टेट एजंट म्हणून काम करतात. त्यांचा वांद्रे आणि बोरिवली परिसरात इस्टेट एजंटचे काम चालते. एलआयसी कॉलनी, शांती आश्रम परिसरात एक महिला खानावळ चालवत असून तिच्याकडे ते अनेकदा जेवणासाठी जात होते. तिच्या मार्फत त्यांची एका महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. गेल्या एक-दोन वर्षांपासून त्यांच्या भेटीगाठी आणि बोलणे सुरु होते. गुरुवारी २२ ऑगस्टला दुपारी दिड वाजता खानावळ चालविणार्या महिलेच्या घरी गेले होते. तिथे त्यांची त्यांच्या मैत्रिणीशी भेट झाली होती. या भेटीनंतर ते निघून गेले. यावेळी त्यांना दोन अज्ञात व्यक्तींनी अडविले. पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांनी त्यांचे दोन्ही महिलांशी संबंध आहेत. त्यांच्यासोबत चुकीचे कृत्य करतो. तुझ्या पत्नीला ही माहिती आहे का, तुझ्या पत्नीचा मोबाईल क्रमांक दे, तिला तुझे कारनामे सांगतो असे सांगून त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. तुझ्याविरोधात खूप तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यामुळे तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करतो अशी या दोघांनी त्यांना धमकी दिली. या धमकीनंतर ते प्रचंड घाबरले. त्यांनी त्यांच्याकडे विनंती करुन त्याच्या पत्नीला काहीही सांगू नका. माझे कुटुंब उद्धवस्त होईल असे सांगून त्यांच्याकडे विनंती केली.
यावेळी या दोघांनी त्यांच्याकडे प्रकरण मिटविण्यासाठी पंधरा लाखांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी त्यांना दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर त्याने त्याच्या मित्राला फोन करुन त्याच्याकडे दहा लाखांची व्यवस्था केली. मित्राकडून दहा लाख घेतल्यानंतर त्यांनी ती रक्कम दोघांनाही दिली. त्यानंतर ते दोघेही निघून गेले होते. घडलेला प्रकार त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितला. यावेळी त्याने त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार एमएचबी पोलिसांना सांगून दोन्ही तोतया पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध ३०८, २०४, ३५१, ३५२, ३ (२) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना वेगवेगळ्या परिसरातून आयुब खान, जितेंद्र पटल आणि सुदर्शन चंदारे या तिघांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. या तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिन्ही आरोपींना शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिघांनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून सात लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.