गुंगीचे औषध देऊन २४ वर्षांच्या तरुणीवर लैगिंक अत्याचार
पोलिसांत तक्रार केल्यास अश्लील फोटो व्हायरलची धमकी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – फालुद्यातून गुंगीचे औषध देऊन एका २४ वर्षांच्या तरुणीवर तिच्याच परिचित तरुणाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आकाश नावाच्या आरोपीविरुद्ध पंतनगर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसात तक्रार केल्यास तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरलची धमकी त्याने तिला दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आकाश हा पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.
२४ वर्षीय पिडीत तरुणी ही घाटकोपर परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत सेल्स पर्सन म्हणून म्हणून कामाला आहे. तिच्याच सोसायटीमधये आकाश हा राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत त्याने तिला त्याच्या घरी बोलाविले होते. तिला फालुद्यातून गुंगीचे औषध दिले होते. ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे त्याने त्याच्या मोबाईलवर व्हिडीओ आणि फोटो काढले होते. ते व्हिडीओ आणि फोटो दाखवून तो तिला ब्लॅकमेल करत होता. त्याच्या मनाप्रमाणे वागली नाहीतर तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करुन तिची बदनामी करण्याची धमकी देत होता. या धमकीनंतर त्याने तिच्यावर ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत अनेकदा नैसगिंक व अनैसगिक लैगिंक अत्याचार केला होता. त्याच्या या अत्याचाराला ती कंटाळून गेली होती. यावेळी त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. मात्र त्याने तिच्याशी लग्न केले नाही. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली होती.
यावेळी त्याने तिला पोलिसांत तक्रार केल्यास किंवा याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने तिला शिवीगाळ करुन प्रचंड मारहाण केली होती. तसेच तो तिला सतत जिवे मारण्याचीही धमकी देत होता. या प्रकारानंतर तिने पंतनगर पोलिसात आकाशविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ६४, ६४ (२), (एम), १२३, ३५१ (२), ३५२, ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत अद्याप आकाशवर अटकेची कारवाई झाली नसून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.