अकरावीच्या कॉलेज प्रवेशासाठी दिड लाखांची लाचेची मागणी

पन्नास हजाराची घेताना कॉलेजच्या प्रशासकीय अधिकार्‍याला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२४
मुंबई, – अकरावीला कॉमर्स शाखेत प्रवेश देण्यासाठी दिड लाखांची लाचेची मागणी करुन पन्नास हजार रुपयांची लाच घेताना घाटकोपरच्या एका नामांकित कॉलेजच्या प्रशासकीय अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. रविंद्रनाथ शिवपूजन सिंह असे या अधिकार्‍याचे नाव असून त्याच्या अटकेने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

यातील तक्रारदार घाटकोपरचे रहिवाशी असून त्यांच्या मुलीने दहावीची परिक्षा दिली होती. त्यात तिला चांगले गुण मिळाले होते. तिला कॉमर्स शाखेत अकरावीसाठी प्रवेश हवा होता. त्यामुळे तिने प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरुन रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजसह इतर सहा कॉलेजची नावे यादीत दिली होती. दोन वेळा कॉलेजची यादी प्रसिद्ध झाली होती, मात्र या यादीत तिच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे तिच्या वडिलांनी घाटकोपरच्या हिंदी विद्याप्रचार समितीच्या कॉलेज आणि हिंदी हायस्कूलमधील प्रशासकीय अधिकारी असलेले कनिष्ठ लिपीक रविंद्रनाथ सिंह यांची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्यांना अजून एक यादी बाकी आहे, या यादीत त्यांच्या मुलीचे नाव येईल, तुम्ही थोडे दिवस वाट बघा असा सल्ला दिला होता. दोन यादीत मुलीचे नाव न आल्याने त्यांनी स्थानिक विधानपरिषदेचे आमदार राजहंस धनंजय सिंह यांचे शिफारस पत्र घेऊन पुन्हा रविंद्रनाथ सिंह यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्याने त्यांना त्यांच्या मुलीला कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे सांगून त्यांच्याकडे दिड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

ही लाच दिल्याशिवाय तिच्या मुलीला कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही याची खात्री होताच त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून रविंद्रनाथ सिंह याच्याविरुद्ध बुधवारी २८ ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित विभागाकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात त्याने त्यांच्याकडे दिड लाखांची मागणी करुन पन्नास हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या अधिकार्‍यांनी गुरुवारी २९ ऑगस्टला तिथे सापळा लावून तक्रारदाराकडून पन्नास हजार रुपयांची लाचेची अधिकारी कॉलेजच्या प्रशासकीय अधिकारी रविंद्रनाथ सिंह याला या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध कलम ७ भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला या अधिकार्‍यांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page