मालाड येथे तीन तर चेंबूर येथे तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार
चौदा वर्षांचा मुलाचा ताबा पालकांना तर २८ वर्षांच्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मालाड येथे तीन वर्षांच्या मुलीवर चौदा वर्षांच्या तर चेंबूर येथे तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अठ्ठावीस वर्षांच्या तरुणाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मालाड आणि आरसीएफ पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील चौदा वर्षांच्या मुलाला नोटीस देऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले तर दुसर्या आरोपीस आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
३३ वर्षांची तक्रारदार महिला ही मालाड येथे राहत असून तिला तीन वर्षांची मुलगी आहे. तिच्याच शेजारी चौदा वर्षांचा आरोपी मुलगा राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. कामानिमित्त ही महिला बाहेर गेल्यानंतर आरोपी मुलगा तिच्या घरी येत होता. तो तिच्या तीन वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे तिच्यावर लैगिंक अत्याचार करत होता. १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत त्याने अनेकदा तिच्याशी अश्लील चाळे केले होते. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी महिलेच्या लक्षात आला होता. त्यानंतर तिने मालाड पोलिसांत आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही माहिती त्याच्या पालकांना देण्यात आलीद असून तिला भारतीय न्याय सहिता ३५ अ कलमांतर्गत नोटीस देऊन त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याला योग्य ती समज दिल्याचे सांगण्यात आले.
दुसर्या घटनेत एका तेरा वर्षांच्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला लग्नाचे आमिष दाखविण्यात आले होते. यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन २८ वर्षांच्या आरोपीने पिडीत मुलीशी ६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत लैगिंक अत्याचार केला होता. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रार अर्जावरुन आरसीएफ पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला रविवारी पोलिसांी अटक केली. आरोपीविरुद्ध अपहरणाचा आरसीएफ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी हा पिडीत मुलीच्या घरी राहत होता. याच दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध झाले आणि त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.