मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मानखुर्द रेल्वे पटरीजवळील एका नाल्याजवळ बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर त्याच्याच परिचित २५ वर्षांच्या आरोपीने अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आकाश नावाच्या आरोपी तरुणाला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
३० वर्षांची तक्रारदार महिला ही घरकाम करत असून मानुखर्दच्या साठेनगर परिसरात राहते. तिला बारा वर्षांचा मुलगा असून तो सध्या शिक्षण घेतो. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता तो घरासमोरच खेळत होता. यावेळी याच परिसरात राहणारा आकाश नावाच्या एका २५ वर्षांच्या तरुणाने त्याला भाजी घेऊन देतो असे सांगून सोबत नेले. काही वेळानंतर ते दोघेही मानखुर्द रेल्वे पटरीजवळील एका नाल्याजवळ आले. तिथेच त्याने मुलाला अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त करुन त्याच्यासोबत अनैसगिक लैगिंक अत्याचार केला होता. त्याने विरोध केल्यानंतर त्याने दगडाने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. सायंकाळी साडेसात वाजता तो घरी आला आणि त्याने घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने त्याला घेऊन मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने आकाशविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपी तरुणाविरुद्ध पोलिसांन अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपीस परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.