शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ८८ लाखांची फसवणूक 

0
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ सप्टेंबर २०२४
मुंबई, –  शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली व्यावसायिकाची ८८ लाख ५६ हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. गेल्या वर्षी त्याने सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीवर त्याने क्लिक केले. क्लिक केल्यावर ते एका व्हाटस अप ग्रुप मध्ये जोडले गेले. त्या ग्रुप वर शेअर ट्रेडिंगची माहिती पुरवली जात होती. जून महिन्यात एकीने त्याना मेसेज करून ट्रेडिंग साठी एक अप्स डाऊन लोड करण्यास सांगितले. अप्स डाऊन लोड झाल्यावर केवायसी देखील झाले. एक महिला ही त्याना पैसे जमा करण्यासाठी सांगत होती. त्यानुसार तक्रारदार हे ठरविक रक्कम त्या खात्यात पाठवत होते.
रक्कम पाठवल्यानंतर त्याना अप्सवर फायदा झालेला दिसत होता. या घटनेनंतर महिलेने तक्रारदार याना त्या ग्रुप मधून बाहेर पडण्यास सांगून दुसऱ्या ग्रुप मध्ये एड होण्यास सांगितले. महिलेने दिलेल्या सूचनेनुसार त्याने ८८ लाख ५६ हजार रुपये पैसे गुंतवले. पैसे गुंतवल्यानंतर त्याने जमा झालेला नफा काढण्यासाठी महिलेला विनंती केली. तिने अप्सवर जाऊन नफा कसे काढायचा हे सांगितले. दोन वेळेस त्याने जमा झालेला नफा काढला होता. अप्सवर त्याना एकूण ५ कोटी ११ लाख जमा झाल्याचे दिसले. कंपनीचे शुल्क घेऊन बाकीचे पैसे खात्यात वर्ग करण्यास तक्रारदार याने सांगितले. तेव्हा एकाने आणखी ७० लाख रुपये भरण्यास सांगितले. ती रक्कम भरणे तक्रारदार याना शक्य नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने त्या कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा त्या नावाचा एकही व्यक्ती तिथे कार्यरत नसल्याचे समजले. तसेच कंपनी कडून कोणत्याही प्रकारच्या टिप्स दिल्या जात नसल्याचे त्याना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page