मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – गणेशोत्सव काळात पोलिसांचा मुंबईत तगडा बंदोबस्त असणार आहे. ३२ पोलीस उपायुक्त, ४५ सहायक आयुक्त, २४३५ पोलीस अधिकारी आणि १२४२० पोलीस शिपाई हे तैनात असणार आहे. महत्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ, क्यूआरटी पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅट, होमगार्ड तैनात केले जाणार आहे.
मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे मुंबईत येत असतात. भाविका प्रमाणे राजकीय नेते, अति महत्वाच्या व्यक्ती, सिने सृष्टीतील मंडळी हे मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांना भेटी देत असतात. उत्सव काळात काही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. गणेशोत्सव काळात सुरक्षेबाबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक पार पडली. या बैठकीत सुरक्षे बाबत चर्चा झाली.
उत्सव काळात ३२ पोलीस उपायुक्त, ४५ सहायक आयुक्त, २४३५ पोलीस अधिकारी आणि १२४२० पोलीस शिपाई हे तैनात असणार आहे. महत्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ, क्यूआरटी पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅट, होमगार्ड तैनात केले जाणार आहे. गर्दी दरम्यान महिलांच्या छेदछाडीचे प्रकार होऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे.७ ते १७ सप्टेंबर काळात पोलीसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी काही आक्षेपार्ह आणि बेवारस वस्तू दिसल्यास त्याची माहिती पोलीस हेल्प लाईन १०० , ११२ या क्रमांकावर देण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वतीने स्थानिक मंडळांना देखील सूचना दिल्या आहेत.
मुंबई पोलिसा प्रमाणे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी गणेशोत्सव काळात सुरक्षे बाबत उपाय योजना केल्या आहेत. दक्षिण मुंबईतील गिरगाव, खेतवाडी, मलबार हिल, चिंचपोकळी, लालबाग येथील प्रसिद्ध मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. मध्य रेल्वेच्या दादर ते भायखळा स्थानका दरम्यान आणि पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ, प्रभादेवी, ग्रॅन्टरॊड, चर्नी रोड स्थानकात पोलीस तैनात ठेवण्यात आले आहे. लोकल प्रवासात हुल्लड बाजी करणे, स्टंट करणाऱ्यावर पोलीस लक्ष ठेऊन असणार आहे.