मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२४
मुंबई, – घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीसह मावशीच्या मुलीचा विनयभंग तिच्याच नातेवाईकांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध मालवणी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
१८ वर्षांची तक्रारदार तरुणी ही मालाडच्या मालवणी परिसरात राहते. तिच्या आईचे निधन झाले असून तेव्हापासून ती तिच्या मावशीकडे राहते. आरोपी मावशीचा पती आहे. तीन दिवसांपूर्वी रात्री तिची मावशीची सोळा वर्षांची मुलगी घरात झोपली होती. यावेळी तिच्या पित्यानेच तिच्याशी झोपेत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर तक्रारदार तरुणीही घरात झोपल्या असताना त्याने तिच्यासोबतही अशाच प्रकारे अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्याने तिच्या अंगावर झोपून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. तिने विरोध केल्यांनतर त्याने तिच्या तोंडावर चादर टाकून तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिने तिच्या मावशीला सांगितला. त्यानंतर तिने मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे. आरोपी हा तक्रारदाराचा मावशीचा पती तर सोळा वर्षांच्या मुलीचा पिता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सहा वर्षांच्या मुलीचा विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक
दुसर्या घटनेत सहा वर्षांच्या मुलीशी नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सल्लाउद्दीन इस्लामउद्दीन नाझमी या २८ वर्षांच्या तरुणाला वाकोला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ३७ वर्षांची तक्रारदार वकिल महिला ही सांताक्रुज येथे राहत असून तिला सहा वर्षांची मुलगी आहे. रविवारी रात्री उशिरा ती तिच्या काकांच्या घरी गणपतीचे दर्शन घेऊन तिच्या घरी जात होती. यावेळी तिला वाटेत सल्लाउद्दीन नावाचा एक तरुण भेटला. त्याने वाईट उद्देशाने तिच्या छातीसह पाठीवरुन नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि जोरात ओरडली. हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात येताच तिने सल्लाउद्दीनला जाब विचारला. यावेळी त्याने फक्त हात लावला, आता मला मारहाण का असे बोलून त्याची पोलिसात ओळख असल्याची तिला धमकी देऊ लागला. त्यानतर तिने वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सल्लाउद्दीनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.